सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्यांचे विशेष लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST2021-04-07T04:07:56+5:302021-04-07T04:07:56+5:30

८ एप्रिलपासून मोहीम - मनपातर्फे ऑटो चालक, डिलिव्हरी बॉय यांच्यासाठी विशेष मोहीम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा ...

Special vaccinations for those who can become super spreaders | सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्यांचे विशेष लसीकरण

सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्यांचे विशेष लसीकरण

८ एप्रिलपासून मोहीम - मनपातर्फे ऑटो चालक, डिलिव्हरी बॉय यांच्यासाठी विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा प्रकोप विचारात घेता सुपर स्प्रेडर ठरण्याचा धोका असलेले ऑटोरिक्षा चालक, सायकलरिक्षा चालक, ई-रिक्षा चालक, काळी-पिवळी टॅक्सी चालक, ओला-उबर यासारख्या कंपनीचे चालक व खासगी ट्रॅव्हल्स चालक आदींना शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय रुग्णालयात लस दिली जाईल. ८ एप्रिलपासून याला सुरुवात होत आहे.

नागपुरात लसीकरण अभियानाला गती देण्यासाठी मनपातर्फे विशिष्ट नागरिकांसाठी जे आपल्या रोजगारासाठी घराच्या बाहेर असतात, त्यांचा लसीकरण करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.

मनपातर्फे ८ एप्रिल रोजी सगळ्या वाहन चालकांना लस दिली जाईल, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. वाहन चालक आपल्यासोबत आपल्या परिवाराच्या पात्र व्यक्तींनासुद्धा लसीकरणासाठी आणू शकतात. तसेच १२ एप्रिलला पार्सलची डिलिव्हरी करणाऱ्या नागरिकांचे लसीकरण सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये होणार आहे. यामध्ये फूड डिलिव्हरी करणारे, पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या सर्व नागरिकांचा समावेश आहे. त्यानंतर १४ एप्रिलला भाजीपाला विकणारे, फळ विकणारे आणि दुधाची डिलिव्हरी करणाऱ्या नागरिकांना लस दिली जाईल. तसेच १६ एप्रिलला कामगार आणि हॉकर्स, १८ एप्रिलला मीडियामध्ये काम करणारे कर्मचारी व पत्रकार, २० एप्रिलला व्यापारी व मेडिकल दुकानदार, २२ एप्रिलला रेस्टाॅरंट व हॉटेल कर्मचारी तसेच २४ एप्रिल रोजी सेल्स व मार्केर्टिंगचे काम करणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केल्या जाईल. लसीकरणासाठी येताना सोबत आधारकार्ड किंवा पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सोबत आणायचे आहे.

...

दर बुधवारी महिलांना लसीकरण

समाजात महिलांची टक्केवारी ५० टक्के आहे. त्यांनासुद्धा लसीकरण करणे गरजेचे आहे. मनपाद्वारे प्रत्येक बुधवारी महिलांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली जाईल. या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे हा आहे.

...

असे राहील लसीकरण

८ एप्रिल - ऑटो चालक, ई-रिक्षा चालक

१० एप्रिल - डिलिव्हरी व कुरियर बॉय

१२ एप्रिल - भाजी व दूध विक्रेते

१४ एप्रिल - मजूर व हेल्पर

१६ एप्रिल - मीडिया कर्मचारी, पत्रकार

१८ एप्रिल - ट्रेडर्स

२० एप्रिल - रेस्टाॅरंट, हॉटेल्स, व्यापारी

२२ एप्रिल - सेल्स व मार्केटिंग

२४ एप्रिल - हॉकर्स

२६ एप्रिल - बँक कर्मचारी

दर बुधवारी - महिला

Web Title: Special vaccinations for those who can become super spreaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.