महिलांसाठी आज विशेष लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST2021-09-21T04:10:48+5:302021-09-21T04:10:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी महिलांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पालकमंत्री ...

महिलांसाठी आज विशेष लसीकरण मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी महिलांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी शहरात महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
मनपाच्या १५५ केंद्रांवर महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. या मोहिमेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त महिलांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
नागपूर शहरासह जिल्ह्यामध्ये २१ सप्टेंबर हा महिला लसीकरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. गृहिणी, शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचारी, मजूर, कामगार, घरकाम करणाऱ्या अशा सर्व महिलांनी सहभागी होऊन आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असेही आवाहन केले आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात आतापर्यंत १६,४३,५८६ महिलांचे लसीकरण झाले आहे तसेच १८,०३,९७० पुरुषांनी लस घेतली आहे. शहर आणि जिल्हा मिळून ३४,४८,१३८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये २४,८३,७८३ नागरिकांनी प्रथम डोस आणि ९,६४,३५३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानांतर्गत शहरातील मनपाच्या १५५ केंद्रांवर नियमित लसीकरण सुरू राहणार आहे.