एनडीएच्या परीक्षेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 07:00 IST2020-09-05T07:00:00+5:302020-09-05T07:00:11+5:30

रविवारी नागपुरात असलेल्या एनडीएच्या परीक्षेसाठी रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची योजना केली आहे.

Special trains for NDA exams | एनडीएच्या परीक्षेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

एनडीएच्या परीक्षेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी नागपुरात असलेल्या एनडीएच्या परीक्षेसाठी रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची योजना केली आहे. त्यानुसार नागपूरवरून कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, अकोला, अमरावती येथे विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येतील.

रेल्वेने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार अशा गाड्या धावणार आहेत.
कोल्हापूर- नागपूर
कोल्हापूर- नागपूर विशेष रेल्वेगाडी शनिवारी सकाळी ८.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. या गाडीला १८ स्लिपर व ६ जनरल कोच राहतील.

पुणे- नागपूर
पुणे -नागपूर रेल्वेगाडी शनिवारी दुपारी ४.१५ वाजता रवाना होईल व दुसºया दिवशी सकाळी ६.१५ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री ८.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. या गाडीला १८ स्लिपर व ६ जनरल कोच राहतील.

मुंबई-नागपूर
मुंबई -नागपूर ही गाडी शनिवारी सायंकाळी ५ वाजता रवाना होईल व दुसºया दिवशी सकाळी ६ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री ९ वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. या गाडीला १६ स्लिपर, ३ वातानुकूलित व २ जनरल कोच राहतील.

नाशिक रोड-नागपूर
नाशिक रोड- नागपूर ही गाडी शनिवारी दुपारी ४.१० वाजता रवाना होईल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री ९.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघेल आणि दुसºया दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबईला पोहोचेल. या गडीला १६ स्लिपर व ६ जनरल कोच आहेत.

अहमदनगर- नागपूर स्पेशल
अहमदनगर- नागपूर स्पेशल रेल्वेगाडी शनिवारी दुपारी ४ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता नागपूरला पोहोचेल आणि रविवारी रात्री १० वाजता परतीच्या प्रवासाला निघून दुसऱ्या दिवशी १०.४० वाजता अहमदनगरला पोहोचेल. या गाडीला १८ स्लिपर व ४ जनरल कोच राहतील.

पनवेल- नागपूर स्पेशल
पनवेल- नागपूर स्पेशल ही गाडी शनिवारी दुपारी १.५० वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी पहाटे ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री १०.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. या गाडीला १३ स्लिपर, ३ वातानुकूलित व ५ जनरल कोच राहतील.

नागपूर-अमरावती मेमू
नागपूर -अमरावती दरम्यान ८ डब्यांची मेमू स्पेशल चालविली जाईल. ही गाडी शनिवारी मध्यरात्री १२.१५ वाजता अमरावतीहून रवाना होईल व पहाटे ५.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. रविवारी रात्री ११ वाजता ही गाडी नागपूरहून परतीच्या प्रवासाला निघेल व पहाटे ४ वाजता अमरावतीला पोहोचेल. ८ डब्यांचीच जळगाव - नागपूर मेमू शनिवारी रात्री ९.३० वाजता रवाना होईल व दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री १०.४५ वाजता परतीच्या प्रवासाला निघेल व पहाटे ५.४० वाजता जळगावला पोहोचेल.

अकोला-नागपूर
अकोला -नागपूर मेमू शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता रवाना होईल व पहाटे ५ वाजता नागपूर स्टेशन गाठेल. ही गाडी रविवारी रात्री ८ वाजता परतीच्या प्रवासाला निघून रात्रा ११.५५ वाजता अकोल्याला पोहोचेल. बल्लारशा - नागपूर मेमू शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता रवाना होईल व पहाटे ४.४५ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री ११.१५ वाजता परतीच्या प्रवासाला निघून पहाटे ४ वाजता बल्लारशाला पोहोचेल.

 

Web Title: Special trains for NDA exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.