धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई, पुणेसाठी विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:36 AM2019-10-05T00:36:44+5:302019-10-05T00:37:21+5:30

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने आरक्षित सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाड्या, विशेष शुल्कावर अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Special trains to Mumbai, Pune for Dhammachakra Pravartan Din | धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई, पुणेसाठी विशेष रेल्वेगाड्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई, पुणेसाठी विशेष रेल्वेगाड्या

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने आरक्षित सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाड्या, विशेष शुल्कावर अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-अजनी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या आणि नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडीची एक फेरी सोडण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२७३ लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ११ ऑक्टोबरला रात्री ११.०५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता नागपुरला येईल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२७२ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरला दुपारी १२.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ३.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी आणि अजनीला थांबेल. या गाडीत १४ स्लिपर, ६ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहतील. तसेच ०२११५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर स्पेशल रेल्वेगाडी ८ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून रात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३ वाजता अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२११६ अजनी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल रेल्वेगाडी अजनीवरून ९ ऑक्टोबरला रात्री ११.०५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि सिंदीला थांबेल. या गाडीता १३ स्लिपर, ६ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहतील. रेल्वेगाडी क्रमांक ०१२७० नागपूर-पुणे स्पेशल रेल्वेगाडी नागपूरवरून ८ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.१० वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड येथे थांबेल. या गाडीत १३ स्लिपर, ६ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहतील.

Web Title: Special trains to Mumbai, Pune for Dhammachakra Pravartan Din

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे