Special trains to LTT, Mumbai from Nagpur due to Diwali | दिवाळीनिमित्त नागपूरवरून एलटीटी, मुंबईसाठी विशेष रेल्वेगाड्या
दिवाळीनिमित्त नागपूरवरून एलटीटी, मुंबईसाठी विशेष रेल्वेगाड्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाड्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूरवरून लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मुंबईसाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२०३२ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून बुधवारी २३ ऑक्टोबरला रात्री १० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे येथे थांबेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२३४ नागपूर-मुंबई सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून २४, २६ आणि २८ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता मुंबईला पोहोचेल. ही गाडी अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर येथे थांबेल. या गाडीत एकूण २० कोच असून त्यात १४ स्लिपर, ४ साधारण द्वितीय श्रेणी आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.


Web Title: Special trains to LTT, Mumbai from Nagpur due to Diwali
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.