नागपूर- इंदूर आणि नागपूर-महू दरम्यान विशेष रेल्वेसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:12 IST2021-08-19T04:12:05+5:302021-08-19T04:12:05+5:30

नागपूर : रेल्वेने नागपूर ते इंदूर आणि नागपूर ते डॉ. आंबेडकरनगर (महू) अशी विशेष रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय ...

Special train service between Nagpur-Indore and Nagpur-Mhow | नागपूर- इंदूर आणि नागपूर-महू दरम्यान विशेष रेल्वेसेवा

नागपूर- इंदूर आणि नागपूर-महू दरम्यान विशेष रेल्वेसेवा

नागपूर : रेल्वेने नागपूर ते इंदूर आणि नागपूर ते डॉ. आंबेडकरनगर (महू) अशी विशेष रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

याअंतर्गत ०९२१३ ही इंदूर-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वे २२ ऑगस्टपासून दर रविवारी चालेल. ०९२२३ डॉ. आंबेडकरनगर (महू)-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वे २३ ऑगस्टपासून प्रत्येक सोमवारी चालविण्यात येईल. तसेच ०९२२३ डॉ. आंबेडकरनगर (महू)- नागपूर ही साप्ताहिक विशेष रेल्वे १७ ऑगस्टपासून सुरू झाली. ती प्रत्येक मंगळवारी चालवण्यात येईल. तसेच नागपूर- डॉ. आंबेडकरनगर (महू) ही विशेष रेल्वे १८ ऑगस्टपासून प्रत्येक बुधवारी चालवण्यात येईल. या रेल्वेसाठी तिकीट बुकिंग सर्व कॉम्प्युटराईज आरक्षण केंद्र आणि वेबसाईटवर सुरु झाले आहे. या रेल्वेत केवळ कन्फर्म तिकीट असणारे प्रवासीच प्रवास करू शकतील. त्यांना कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

Web Title: Special train service between Nagpur-Indore and Nagpur-Mhow