नागपूर-मुंबई दरम्यान विशेष रेल्वेगाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 22:05 IST2020-12-11T22:04:39+5:302020-12-11T22:05:04+5:30
train Nagpur news प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाडीची एक फेरी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर-मुंबई दरम्यान विशेष रेल्वेगाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाडीची एक फेरी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२०४८ नागपूर-मुंबई विशेष रेल्वेगाडी रविवारी १३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता मुंबईला पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२०४७ मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाडी मंगळवारी मुंबईवरून १५ डिसेंबरला सायंकाळी ५.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला पहाटे ५.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नासिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदुर रेल्वे, धामणगाव, पुलगाव, वर्धा येथे थांबेल. या गाडीत एकूण १८ कोच आहेत. यात ७ स्लिपर, २ एसएलआर, १ प्रथम श्रेणी वातानुकूलित, २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ४ तृतीय श्रेणी वातानुकूलित, २ द्वितीय साधारण कोचचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.