शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हवी विशेष कायद्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 03:20 IST

एकनाथ शिंदे यांच्या गडचिरोली दौऱ्यात पोलीस अधिकाऱ्यांची मागणी

नागपूर : नक्षलवाद्यांवर अंकुश प्रस्थापित करण्यासाठी छत्तीसगड राज्याने स्पेशल पब्लिक सिक्युरिटी अ‍ॅक्ट लागू केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा लागू झाला तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील क्षेत्रात पोलिसांना अधिक प्रभावी पद्धतीने काम करता येईल, असे मत गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडचिरोली दौºयादरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केले.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर दुसºयाच दिवशी राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. गृहमंत्र्यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर गोडलवाही या नक्षलग्रस्त भागातील आऊटपोस्टला भेट देत तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्या दरम्यान महाराष्ट्र पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपी या विभागांतील अधिकाºयांशी झालेल्या चर्चेदरम्यान छत्तीसगडमध्ये लागू असलेल्या या कायद्याचा ऊहापोह झाला. याबाबत राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता छत्तीसगडच्या कायद्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, त्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या कायद्याच्या परिणामांची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. ती घेतल्यानंतरच मला याबाबतची स्पष्ट भूमिका मांडून पुढील दिशा ठरवता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गडचिरोली पोलिसांचे प्रलंबित प्रस्ताव आणि मागण्या मार्गी लावण्यासाठी गृहविभागाच्या अधिकाºयांची एक बैठक लवकरच बोलावणार असून त्यात या कायद्याबाबतची मते जाणून घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.नक्षलवादाचा बीमोड; आदिवासींचा विकासनक्षलवाद्यांच्या दहशतीचा बीमोड करून या भागातल्या जनतेची सामाजिक आणि आर्थिक प्रगती करून समाजाच्या मु्ख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा शब्द यावेळी गृहमंत्र्यांनी बैठकीत दिला. पोलीस भरतीपासून अन्य प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी सरकार कटिबद्ध असून मंत्रिमंडळात त्याबाबतचे निर्णय तातडीने घेतले जातील. उद्योगांना चालना, आधुनिक शेतीसाठी प्रयत्न, आदिवासी मुलांना शहरांमध्ये प्रगत शैक्षणिक सुविधा, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी अशा अनेक आघाड्यांवर काम करावे लागेल. लोकांच्या हाताला काम मिळाले की नक्षलवादाचा प्रभाव नक्की कमी होईल, अशा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर