शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

विशेष मुलाखत : देशात भाजपाविरोधात प्रचंड असंतोष : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 9:00 PM

केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविरोधी पक्षाचे ऐक्य अत्यावश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.लोकमतशी विशेष बातचीत करताना त्यांनी निवडणुकांसह विविध विषयावर भाष्य केले. येत्या लोकसभा व विधानसभेची निवडणूक लक्षात घेता बीआरएसपीने राज्यभरात तयारी चालविली आहे. लोकांमध्ये भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. होऊ घातलेल्या पाच राज्याच्या निवडणुकांत भाजपाला फटका बसेल. अशावेळी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गैरभाजपा, गैरशिवसेना अशा सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी उभी राहणे गरजेचे आहे. आम्ही एकत्रीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. आघाडी झाल्यास राज्यात दोन लोकसभेच्या जागांची आमची मागणी आहे. मात्र आघाडी झाली नाही तर राज्यात लोकसभेच्या ४० व विधानसभेच्या २०० च्यावर जागा लढण्याची आमची तयारी आहे. त्याअंतर्गत नुकतेच विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र कोकण भागात अधिवेशनाचे आयोजन पक्षातर्फे करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेससह  राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड आदी पक्ष व संघटनांना आम्ही बोलाविले होते. ओबीसी, आदिवासी यांच्यासह लहानमोठ्या पक्ष, संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही एक पर्याय निश्चितच देऊ असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला. आंबेडकरी राजकारणाला आरक्षण, अ‍ॅट्रासिटी व स्कॉलरशीपच्या चौकटीत बांधण्यात आले आहे. मात्र आपल्याला शेतकरी, रोजगार याबाबत धोरणात्मक निर्णयाद्वारे आंबेडकरी राजकारणाची व्यापकता लोकांना दाखवून द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले.बसपाचे अस्तित्वच धोक्यातबहुजन समाज पक्षाची देशात वाईट अवस्था आहे. मिशनचे कार्यकर्ते दूर गेले असून केवळ निवडणुकांपुरते राजकारण उरलेले आहे. विविध राज्यातील समीकरणे हाताळण्यात नेतृत्व अपयशी ठरले आहे. येत्या निवडणुकांनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अस्तित्वावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बसपाचे अस्तित्व विदर्भापुरते मर्यादित होते, मात्र येथेही मतांची टक्केवारी कमी झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यात बीआरएसपीला बऱ्यापैकी यश आल्याचा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला.बाळासाहेबांनी भूमिकेचा पुनर्विचार करावामहाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या ऐक्याच्या प्रक्रियेत प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी सध्याच्या आडमुठ्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्यांनी सोयीचे समीकरण करू नये. संविधान बचावचा टाहो फोडण्यापेक्षा संविधानविरोधी पक्षांना सत्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यामध्ये भाजप-शिवसेनेच्या विजयाचे खापर बाळासाहेबांवरच फुटेल, असे मत डॉ. माने यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :interviewमुलाखतPoliticsराजकारण