शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोना उपाययोजनांसाठी विशेष समन्वय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 22:38 IST

कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागपुरातील जिल्हा प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागपुरातील जिल्हा प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्हाधिकारी व आरोग्य विभाग तसेच इतर आवश्यक विभागांशी समन्वय साधून आवश्यक कारवाई करेल. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका, आरोग्य विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व संबंधित विभागात योग्य समन्वयातून टीम यावर लक्ष ठेवणार आहे. कोरोना संशयिताबाबतची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी समन्वय ठेवण्यात येणार असून, संशयित हा इतर जिल्ह्यातून आला असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी समन्वय साधण्यात येईल.परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यापरदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी आणि त्यापैकी एखाद्या प्रवाशास ताप, खोकला असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. कोरोना चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्त जोखमीच्या व्यक्तींची चाचणी करावी तसेच कमी जोखमीच्या व्यक्तींनी १४ दिवस घरीच थांबण्यास सांगावे. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यासाठी नागपुरात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, रेल्वे विभागाकडेही २०० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले. रुग्णांचे स्क्रीनिंग, संशयित रुग्णांच्या प्रयोगशाळा चाचण्या आणि आरोग्य शिक्षण या बाबींसाठी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉल रुग्णालयातील विशेषज्ञांनी तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करणारकोरोना विषाणूंच्या भीतीमुळे नागरिकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. तसेच विक्रेत्यांनी मास्कचा मानवनिर्मित तुटवडा निर्माण केल्यास किंवा निर्धारित दरापेक्षा जास्त किमतीला विकत असल्याचे आढळून आल्यास आणि बोगस मास्कची विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर