मेट्रो रेल्वे व मेट्रो रिजनच्या विकासावर विशेष लक्ष

By Admin | Updated: September 5, 2014 01:12 IST2014-09-05T01:12:26+5:302014-09-05T01:12:26+5:30

नागपूर शहराच्या बाह्य भागाच्या विकासासाठी मेट्रो रिजनअंतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्याची आपण अंमलबजावणी करू. तसेच महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊ,

Special attention to the development of Metro Rail and Metro Regions | मेट्रो रेल्वे व मेट्रो रिजनच्या विकासावर विशेष लक्ष

मेट्रो रेल्वे व मेट्रो रिजनच्या विकासावर विशेष लक्ष

सभापती हर्षदीप कांबळे यांची ग्वाही : दराडे यांच्याकडून पदभार स्वीकारला
नागपूर : नागपूर शहराच्या बाह्य भागाच्या विकासासाठी मेट्रो रिजनअंतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्याची आपण अंमलबजावणी करू. तसेच महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊ, अशी ग्वाही नासुप्रचे नवनियुक्त सभापती डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.
मावळते सभापती प्रवीण दराडे यांनी गुरुवारी नवनियुक्त सभापती डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे पदभार सोपविला. यावेळी पत्रकारांशी बोलताना कांबळे यांनी नागपूर हे आपल्या आवडीचे शहर असल्याचे सांगितले. या शहराच्या विकासासाठी आपण सर्वोपरी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
तीन हजार नागरिकांसाठी
फ्लॅट योजना - दराडे
अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना राहण्यासाठी घर उपलब्ध व्हावे, यासाठी नासुप्रने वेळोवेळी पुढाकार घेतला. नासुप्रने भामटी येथे २०० फ्लॅटची योजना उभारली. येत्या काळात पारडी येथे ६२५ कोटी रुपये खर्च करून ३,११६ फ्लॅट बांधले जातील, असे मावळते सभापती प्रवीण दराडे यांनी सांगितले. दराडे यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांना उजाळा दिला. ते म्हणाले, आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासाचे पुढील ५० वर्षांचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात आले. पुढील २० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. हरित पट्टा, ना विकास क्षेत्र (एनडीझेड) व आरक्षणाने बाधित असलेले ले-आऊट नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. याचा फायदा तीन लाख लोकांना झाला.
नासुप्रच्या मालकीच्या ६०० खुल्या भूखंडांवर सुरक्षा भिंत बांधण्यात आली. ३५ कोटी रुपये खर्च करून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात आले. ताजबाग सौंदर्यीकरण, दीक्षाभूमीवर पायाभूत सुविधांसाठी निधी देण्यात आला. रस्ते विकासासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. गुंठेवारी ले-आऊटच्या विकासासाठी १४६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Special attention to the development of Metro Rail and Metro Regions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.