मोक्षाचा मार्ग सांगते माँ जिनवाणी
By Admin | Updated: June 10, 2016 03:00 IST2016-06-10T03:00:05+5:302016-06-10T03:00:05+5:30
आचार्य पुष्पदंत म.सा. यांचे शिष्य आचार्य मुनिश्री प्रतीक सागर म.सा. पहिल्यांदा नागपुरात झाले आहे.

मोक्षाचा मार्ग सांगते माँ जिनवाणी
धर्मसभा व मंगल प्रवेश १२ ला : मुनिश्री प्रतीक सागर म.सा. यांच्या आगमनाने जैन लोकांमध्ये उत्साह
नागपूर : आचार्य पुष्पदंत म.सा. यांचे शिष्य आचार्य मुनिश्री प्रतीक सागर म.सा. पहिल्यांदा नागपुरात झाले आहे. त्यांच्या आगमनामुळे नागपुरातील जैन लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
१२ जूनला सकाळी ७.३० वाजता चिटणीस पार्क येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात येणार असून शहरातील प्रमुख मार्ग पादक्रांत करीत इंद्रभवन पार्श्वनाथ दिगंबर जैन बापूराव गल्ली, इतवारी येथे जाईल. सकाळी ८.३० वाजता इंद्रभवन येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. मुनिश्रीचे स्वागतार्थ पुरुष पांढरे वस्त्र आणि महिला केसरी वस्त्र धारण करतील. मुनिश्रीचे अनेक ठिकाणी पुष्पवर्षा आणि ओवाळून स्वागत करण्यात येणार आहे. श्रुतपंचमी गुरुपुष्यामृतनिमित्त क्रांतिवीर मुनिश्री प्रतीकसागर म.सा. यांचे स्वागत शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर, लक्ष्मीनगर येथे गुरुवारी सकाळी ७ वाजता जेरिल लॉनपासून मंगलशास्त्र डोक्यावर ठेवून महिलांनी आणि जैन समाजाने स्वागत केले. त्यानंतर मंदिरात भगवान शांतीनाथ यांचा शांतीधारा अभिषेक करण्यात आला.
श्रुतावतार दिवस संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी जैन धर्माचा पहिला प्रमुखग्रंथ षट्खंडागम १२०० वर्षांपूर्वी आचार्य पुष्पदंत आणि भुतबली यांनी लिपीबद्ध केला होता. मुनिश्री यांनी सरस्वती स्तोत्र म्हणून धर्मसभेचा प्रारंभ केला. मुनिश्री यांनी प्रवचनात सांगितले की, जिनवाणी मां मार्ग दाखविते. तो मोक्षमार्ग असतो. आचार्य पुष्पदंत आणि भुतबली यांनी षट्खंडागममध्ये णमोकार महामंत्र मंगलाचरणच्या धर्तीवर केला. साक्षात अभिषेक जीन चैत्य आणि जीन चैत्यालयचा होतो. शिखरसमोर आरशात दिसणाऱ्या शिखरच्या आकृतीवर जलधारा टाकून अभिषेक करण्यात येतो.
२१ वर्षांनंतर आज गुरुपुष्यामृत योग आला. सायंकाळी ६.३० वाजता १०८ दीपकाने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. मुनिश्री प्रतीकसागर म.सा. शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात विराजमान आहेत. येथे १० जूनला सकाळी ८.३० वाजता प्रवचन होणार आहे.
मुनिश्री यांनी पाश्चात्यावर व्याख्यान देताना विश्व एक व्यापार असल्याचे सांगितले. यामध्ये मानवाला केवळ जगण्याचा अधिकार आहे. भारतीय संस्कृतीवर व्याख्यान देताना त्यांनी सांगितले की, विश्व एक परिवार आहे. यामध्ये जगण्याचे सर्व अधिकार आहेत.
भारत रामकृष्ण, बुद्ध, महावीर यांचा देश आहे. येथे नैतिकता प्रमुख समजली जाते. त्यानंतर धार्मिकतेला स्थान आहे. जो मानव नैतिक असतो, तो धार्मिक असतोच, पण जो धार्मिक असतो, तो नैतिक असतोच असे नाही. त्यांनी सांगितले की, झाड जुने झाल्यानंतरही घरीच राहू द्या. ते फळ देत नाही, पण सावली देतोच. ज्या घरी वयस्कांचा सन्मान होतो, ते घर पृथ्वीवर स्वर्ग आहे. या घरी धनधान्य, समृद्धी नेहमीच वाढते. (प्रतिनिधी)
मान्यवरांची उपस्थिती
जिनवाणी अभिषेक राकेश रजावत कुटुंबाने केला. जिनवाणीचे पाळणा उषाताई सावलकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्वाध्यायी महिला मंडळाने केले. स्वागतगीत कोमल देवलसी यांनी सादर केले. दीपप्रज्वलन अभय पनवेलकर, उपाध्यक्ष सरिता जैन, मंत्री अरविंद हनवंते, महेंद्र पेंढारी, दीपक पनवेलकर, अशोक मेंढे, नेमिनाथ सरोदे यांनी केले. याप्रसंगी हिराचंद मिश्रीकोटकर, राजू सिंघई, आनंद जैन, हुकूमचंद मिश्रीकोटकर, गोपाल पेंढारी, निहार चवरे, रवींद्र चवरे, सरोज मिश्रीकोटकर, राजूल खंडारे, सानू खंडारे, राधिका चवरे, निकिता चवरे, स्मिता नांदगावकर, शैला भोरे, मालू नांदगावकर, सुनीता मिश्रीकोटकर, सुमेघा पेंढारी उपस्थित होते.