रामटेकमध्ये सभापती, सदस्य बिनविराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:14 IST2021-02-23T04:14:11+5:302021-02-23T04:14:11+5:30
सार्वजनिक बांधकाम समिती सभापतिपदी प्रवीण मानापुरे यांची निवड करण्यात आली असून, सदस्यपदी रत्नमाला अहिरकर, संजय बिसमाेगरे, प्रभाकर खेडकर व ...

रामटेकमध्ये सभापती, सदस्य बिनविराेध
सार्वजनिक बांधकाम समिती सभापतिपदी प्रवीण मानापुरे यांची निवड करण्यात आली असून, सदस्यपदी रत्नमाला अहिरकर, संजय बिसमाेगरे, प्रभाकर खेडकर व यादव जांभूळकर, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापतिपदी अनिता टेटवार यांची निवड करण्यात आली तर या समितीच्या सदस्यपदी प्रभाकर खेडकर, रत्नमाला अहिरकर, कविता मुलमुले, सुरेखा माकडे यांची निवड करण्यात आली. महिला व बाल कल्याण आणि शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक कार्य समिती सभापतिपदी उज्ज्वला धमगाये यांची निवड करण्यात आली असून, समितीच्या सदस्यपदी शिल्पा रणदिवे, पद्मा ढेंगरे, सुरेखा माकडे तसेच स्वच्छता वैधक आणि सार्वजनिक आराेग्य समिती सभापतिपदी अलाेक मानकर यांनी निवड करण्यात आली असून, या समितीच्या सदस्यपदी लता कामडे, चित्रा धुरई, संजय बिसमाेगरे, सुमित कोठारी यांची निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली. या समितीच्या सभापतिपदी नगराध्यक्ष दिलीप देशमुख राहणार असून, समितीत पालिका उपाध्याय आलाेक मानकर यांच्यासह अन्य सदस्यांची निवड करण्यात आली. सभेला मुख्याधिकारी अर्चना वंजारी व राजेश सव्वालाखे, नगरसेवक दामाेधर धाेपटे, वनमाला चाैरागडे उपस्थित हाेते.
...
माेहपा नगर परिषद
माेहपा : नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडीसाठी साेमवारी दुपारी विशेष सभा पार पडली. यात सर्व विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची अविराेध निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व नियोजन समितीच्या सभापतिपदी पंजाब चापके यांची निवड करण्यात आली असून, सदस्यपदी विजय वानखेडे व उज्ज्वला चर्जन, बांधकाम समिती सभापतिपदी राजेश नेरकर यांची निवड करण्यात आली असून, सदस्यपदी संजय देशमुख व श्रीधर गणोरकर, शिक्षण समिती सभापतिपदी श्याम खरबडे यांची निवड करण्यात आली असून, या समितीच्या सदस्यपदी श्रीधर गणोरकर व दीपाली खडस्कर यांची निवड करण्यात आली. महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी लता सरोदे यांची निवड करण्यात आली असून, सदस्यपदी शबाना पटेल व लता चिमोटे यांची अविराेध निवड करण्यात आली. नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी या विशेष सभेच्या पीठासीन अधिकारी हाेत्या. मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी सहायक म्हणून जबाबदारी सांभाळली.
...
खापा नगर परिषद
खापा : नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची साेमवारी विशेष सभेत निवड करण्यात आली. सर्व समित्यांच्या सभापती व सदस्यांची अविराेध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी जाहीर केले. या पालिकेत एकूण १४ नगरसेवकांपैकी १५ नगरसेवक भाजपचे असून, काॅंग्रेसचा एक तर एक नगरसेवक अपक्ष आहे. शिक्षण व सांस्कृतिक क्रीडा समिती सभापतिपदी अमोल भुते, बांधकाम समिती सभापतिपदी शेषराव मासूरकर, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी पवण पैठणकर आणि महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी वर्षा गजभिये यांची अविरोध निवड करण्यात आली. या सभेला नगराध्यक्ष प्रियंका मोहटे, पालिकेचे उपाध्यक्ष मुकेश गायधनी, मुख्याधिकारी डॉ. ऋचा धाबर्डे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.