शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सोयाबीन क्षेत्रात ५ टक्के घट; उत्पादन घटले, पण दर एमएसपीखालीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:44 IST

दरवाढीला इथेनॉलचा फटका : पावसामुळे पीक खराब होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोयाबीनचे पेरणीक्षेत्र देशात ५.२५ टक्के, तर राज्यात ४.५२ टक्क्यांनी घटल्याने उत्पादन घटण्याची, तसेच सप्टेंबरमध्ये अतिपावसाचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने पीक खराब होण्याची शक्यता बळावली आहे. सध्या सोयाबीनच्या दराने प्रतिक्विंटल सरासरी ५०० रुपयांची उचल घेतली असली तरी सोया ढेपेची संथ निर्यात, इथेनॉल निर्मितीमुळे मका, गहू व तांदळाच्या ढेपेमुळे सोयाबीनचे दर एमएसपीपेक्षा कमी म्हणजेच प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांच्या आसपासच राहतील.

सरकारने सन २०२४-२५ च्या हंगामासाठी सोयाबीनची एमएसपी ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली असली तरी ऑक्टोबर २०२४ ते मे २०२५ या काळात संपूर्ण देशभर सोयाबीनचे सरासरी दर ४,१०० रुपयांच्या आसपास होते. सरकारने एमएसपी दराने फार काही सोयाबीन खरेदी न केल्याने शेतकऱ्यांनी ते कमी दराने व्यापाऱ्यांना विकले. मुळात सोयाबीनचे दर त्यातील तेलावर ठरत नसून, ते ढेपेवर ठरतात. या ढेपेचा वापर पोल्ट्री व पशुखाद्य म्हणून केला जातो. जागतिक बाजारात भारतीय सोया ढेप व सोयाबीनच्या तुलनेत ब्राझील, अर्जेंटिनाच्या सोया ढेप व सोयाबीनचे दर कमी असल्याने भारताची निर्यात मंदावली आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीनला किमान पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळण्याची शक्यता मावळली आहे.

मका, गहू, तांदळाच्या ढेपेशी स्पर्धाकेंद्र सरकारने २१ डिसेंबर २०२३ रोजी इथेनॉल निर्मितीसाठी मका, गहू व तांदळाच्या वापराला परवानगी दिल्याने या तिन्ही धान्याची ढेप मोठ्या प्रमाणात बाजारात यायला लागली. सध्या सोयाबीनच्या ढेपेचे ३० हजार ते ५० हजार रुपये प्रतिटन असून, मका, गहू व तांदळाची ढेप १६ हजार ते २२ हजार रुपये प्रतिटन दराने मिळत असल्याने पोल्ट्री उद्योग कोंबड्यांच्या खाद्यासाठी सोया ढेपेचा वापर कमी केला आहे.

पेरणीक्षेत्र (लाख हेक्टर)वर्ष                     देश                राज्य                   घट२०२४-२५           १२५.११           ५१.५९          ६.५७ (५.२५%)२०२५-२६           ११८.५४          ४९.२६           २.३३ (४.५२%)

सोया ढेप निर्यात (लाख टन)२०२३-२४ - २३.३३२०२४-२५ - १८.००२०२५-२६ - ३.८७(२०२५-२६ या वर्षात एकूण १४ लाख टन सोया ढेप निर्यातीचा अंदाज)

सोयाबीन उत्पादन, एमएसपी, सरासरी दर (लाख टन/रुपये प्रतिक्विंटल)वर्ष                  उत्पादन              एमएसपी         सरासरी दर२०२०-२१         १०४.५६                 ३,८८०                ४,१६६२०२१-२२          ११८.८९                 ३,९५०               ५,४९१२०२२-२३          १२४.११                 ४,३००                ४,९५१२०२३-२४          ११०.००                 ४,६००                ४,१५०२०२४-२५          १२३.६०                ४,८९२                ४,१७५

टॅग्स :Soybeanसोयाबीनnagpurनागपूर