स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:53+5:302021-03-09T04:09:53+5:30

नागपूर : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. संचालन संयोजिका ...

The sound of female existence was celebrated in various places | स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा

स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा

नागपूर : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. संचालन संयोजिका सरिका चौरसिया यांनी केले तर आभार संजीवनी चौधरी यांनी मानले. यावेळी दीपा पचोरी, छाया शर्मा, जयश्री गुप्ता, सपना तलरेजा, मेघा दीक्षित, नीता तिवारी, रजनी अग्निहोत्री, निश्वत अली, सुमन अग्रवाल, शिखा गुप्ता, मीना बसक, नितू नायक, दया भुटोलिया, रेखा चतुर्वेदी उपस्थित होते.

------------

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन ()

नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने जागतिक महिला दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन, राजसी सेनगुप्ता, सुनीता धोटे उपस्थित होते. संचालन श्वेताली ठाकरे यांनी केले.

--------------

संविधान परिवार ()

नागपूर : संविधान परिवारच्या वतीने इमामवाडा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा तसेच महिला सफाई कर्मचारी, कष्टकरी महिलांचा सत्कार महिला दिनाच्या पर्वावर करण्यात आला. यावेळी मुख्य संयोजक राहून मून, प्रशांत ढाकणे, जितेंद्र जिभे, ॲड. सुरेश घाटे, अनिल इलमकर, राजेंद्र साठे उपस्थित होते.

---------------

Web Title: The sound of female existence was celebrated in various places