स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:51+5:302021-03-09T04:09:51+5:30

नागपूर : विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वैनगंगानगर, अजनी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊ, ...

The sound of female existence was celebrated in various places | स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा

स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा

नागपूर : विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वैनगंगानगर, अजनी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वंदना परिहार, बावणकर, वनिता बन्सोड, मेघा कराळे, आरती तायडे, संजय खोंडे, दीपाली कठाणे उपस्थित होते.

------------

परिचारिका, महिला पोलिसांचा सत्कार

नागपूर : प्रभाग क्रमांक ५च्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दवाखाना, बिनाकी मंगळवारी व धम्मदीपनगर कॉर्पोरेशनच्या दवाखान्यातील परिचारिका व यशोधरा पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक संजय चावरे, नेताजी गजभिये, नामदेव देवतारे, राजू हत्तीठेले, सोनू मिश्रा, नीलेश बोरीकर, विष्णू निनावे, शशिकांत वैद्य, अंकुश बारापात्रे, गोपीचंद किरपाने उपस्थित होते.

------------

दमक्षेच्या वतीने महिला कलावंतांचा सत्कार

नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ महिला कलावंतांचा सत्कार करण्यात आला. यात भरतनाट्यम गुरू रत्नम जनार्दनम, श्रीमती माडखोलकर, कथ्थक नृत्य गुरू प्रियंका अभ्यंकर, ललिता हरदास, स्वाती भालेराव, कुचिपुडी नृत्यगुरू निवेदिता यांचा सत्कार केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर व दीपाली खिरवडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रम अधिकारी दीपक कुळकर्णी, गोपाल बोतावार, श्रीकांत देसाई उपस्थित होते.

-------------

Web Title: The sound of female existence was celebrated in various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.