कार रेसिंगच्या नादात निवृत्त शिक्षकाला उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST2021-09-21T04:10:57+5:302021-09-21T04:10:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बेदरकारपणे कार चालवून एका आरोपीने निवृत्त शिक्षकाला चिरडले. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास गोरेवाडा ...

The sound of car racing blew up the retired teacher | कार रेसिंगच्या नादात निवृत्त शिक्षकाला उडवले

कार रेसिंगच्या नादात निवृत्त शिक्षकाला उडवले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बेदरकारपणे कार चालवून एका आरोपीने निवृत्त शिक्षकाला चिरडले. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास गोरेवाडा रिंग रोडवर हा अपघात घडला. मोहम्मद जहिरुद्दीन मोहम्मद रफिउद्दीन (वय ६२, रा. बोरगाव) असे मृताचे नाव आहे.

निवृत्त शिक्षक असलेले जहिरुद्दीन रविवारी रात्री १०. ३० वाजता आपल्या दुचाकीने गोरेवाडा रिंग रोडने जात असताना अचानक वेगात आलेल्या कार क्रमांक एमएच ४९ एई १२९० च्या चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे जहिरुद्दीन यांचा करुण अंत झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कारचालक मुर्तजा हुसेन शब्बीर टोपीवाला (वय २३, रा. गांजाखेत) आणि रिटस् कारचालक हुसेन सैफी शब्बीर सैफी (वय २४, रा. ईतवारी) हे दोघे कारमध्ये रेस लावून चुकीच्या दिशेने (राँग साइड) जात होते. एक दुसऱ्याच्या समोर जाण्याच्या प्रयत्नात त्यांच्या कारचा वेग आणि चुकीची दिशा जहिरुद्दीन यांचा जीव घेणारी ठरली. मोहम्मद आरिफ अब्दुल वकील यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुर्तजा हुसेन शब्बीर टोपीवाला याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला, तर मोटार वाहन कायद्याच्या उल्लंघन प्रकरणात रिटज् चालक हुसेन सैफी शब्बीर सैफी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

----

दोषींना वाचविण्यासाठी धावपळ

दोन्ही आरोपी बड्या घरची मुलं आहेत. त्यांनी एका वृद्धाचा बेदरकारपणे बळी घेतला, तर पोलिसांनी शिथिल कारवाई करावी म्हणून आरोपींशी संबंधित मंडळींनी रविवारी रात्रीपासून सोमवार दुपारपर्यंत बरीच धावपळ केली.

----

Web Title: The sound of car racing blew up the retired teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.