सोनपूर (आदासा) ग्रामपंचायत अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:10 IST2020-12-31T04:10:31+5:302020-12-31T04:10:31+5:30

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ...

Sonpur (Adasa) Gram Panchayat Conflict | सोनपूर (आदासा) ग्रामपंचायत अविरोध

सोनपूर (आदासा) ग्रामपंचायत अविरोध

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ९ जागांसाठी ९ च उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ग्रा.प.ची निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल. येथे वाॅर्ड क्रमांक १ मधून नीलेश कडू,लिना कडू, नीता जिचकार, वाॅर्ड क्रमांक २ मधून अक्षय धुर्वे, नीतू सहारे, अल्का पडोळे, वाॅर्ड क्रमांक ३ मधून चेतन निंबाळकर,शिल्पा पडोळे, सुरेखा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र डोंगरे, कळमेश्वर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव कोढे, कैलास कापसे, गणपत काकडे, नागोराव भोयर, प्रकाश धोटे,आण्याजी चव्हाण, संजय कडू, सुधाकर पडोळे, राजेंद्र जिचकार, किशोर नागपुरे, नागोराव कोहळे, चिंधुजी चिखले, अजाब चिखले,उकंडराव धवड, संदीप गोतमारे, श्रीराम धोटे, शिवकुमार पडोळे, श्रावण पडोळे, बालाजी कडू उपस्थित होते.

Web Title: Sonpur (Adasa) Gram Panchayat Conflict