मुलाने केला वडिलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:38+5:302021-01-08T04:23:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : व्यसनाधीन वडिलांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचा खून केला. ही घटना ...

मुलाने केला वडिलाचा खून
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : व्यसनाधीन वडिलांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचा खून केला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चापेगडी येथे मंगळवारी (दि.५) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
राजकुमार रघुनाथ गेडाम (४५, रा. चापेगडी, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. मृत राजकुमार गेडाम यांना माेठ्या प्रमाणात दारूचे व्यसन हाेते. ताे दारुच्या नशेत कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ व भांडण करत हाेता. वडिलांकडून आई व बहिणीला दरराेज हाेणाऱ्या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने वार करून वडिलास ठार केले. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पाेलिसांनी विचारपूस केली असता, अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली.
याप्रकरणी कुही पाेलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक कमलेश साेनटक्के करत आहेत.