शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

नागपूर हादरले... क्रिकेट सट्ट्यात पैसे हारल्याने मुलाची आत्महत्या, आईनेदेखील संपविले आयुष्य

By योगेश पांडे | Updated: May 22, 2023 16:46 IST

छापरूनगरमध्ये दुर्दैवी घटना : सलग दुसऱ्या दिवशी ‘डबल आत्महत्या’

नागपूर : क्रिकेट सट्ट्यात हारल्यामुळे प्रचंड आर्थिक फटका बसलेल्या एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याच्या आईनेदेखील विष प्राशन करून आत्महत्या केली. केवळ काही तासांच्या अंतराने दोन्ही आई-मुलाने आयुष्य संपविल्याने छापरूनगर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौकाजवळ ही घटना घडली. खितेन नरेश वाघवानी (२०) असे मृतक मुलाचे नाव आहे तर दिव्या नरेश वाघवानी असे त्याच्या दुर्दैवी आईचे नाव आहे. कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार खितेन हा विद्यार्थी होता व काही काळाअगोदर अगदी सरळ स्वभावाचा मुलगा होता. मात्र तो चुकीच्या संगतीत लागला व काही तरुणांमुळे क्रिकेट सट्ट्याकडे वळला.

मागील वर्षी तो सट्ट्यात काही पैसे हारला होता. मात्र ही बाब त्याने घरच्यांना सांगितली होती व त्याचे वडील ते पैसे हळूहळू देत होते. मात्र खितेनने यावर्षी परत मित्रांच्या सांगण्यावरून आयपीएलच्या सामन्यांवर पैसे लावले, त्यात तो हरला. सट्टेबाज पैशांसाठी त्रास देऊ लागले व यातून खितेन तणावात गेला. रविवारी रात्री त्याचे कुटुंबिय सिव्हील लाईन्समध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरी कुणीच नसताना त्याने स्वयंपाकघरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील कुटुंबाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला तातडीने खाली उतरवून एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून आई दिव्या हिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला व त्यांनी सकाळच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीय जितेशच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत असताना त्याच्या आईची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांनादेखील मृत घोषित केले. या प्रकारामुळे जितशेचे वडील व बहीण अक्षरश: कोलमडले असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. लकडगंज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आई-मुलावर सोबतच अंत्यसंस्कार

जितेशवर अगोदर दुपारी दीड वाजता अंत्यसंस्कार होणार होते. मात्र त्याच्या आईनेदेखील आत्महत्या केल्याने जमलेल्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. आई-लेकावर सायंकाळी गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीnagpurनागपूर