शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 22:17 IST

Nagpur Crime: राजाखान उर्फ राजा अमरावती उर्फ सलीम खान (२१, बुलंद गेट समोर , मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो काही काळापासून आझादनगर, टेका नवी वस्ती येथे राहतो आहे.

-योगेश पांडे, नागपूरशहरातील बार व वाईन शॉप्समध्ये चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून अगदी सिनेस्टाईल कहाणीच समोर आली आहे. त्याच्या वडिलांचा अत्याधिक मद्यप्राशनाने मृत्यू झाला होता. बार व वाईन शॉप चालक स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना दारु विकतात व त्यांच्या जीवाशी खेळतात या संतापातून त्याने चोरी करायला सुरुवात केली. शहरातील याच दुकानांना तो टार्गेट करायचा. पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजाखान उर्फ राजा अमरावती उर्फ सलीम खान (२१, बुलंद गेट समोर , मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो काही काळापासून आझादनगर, टेका नवी वस्ती येथे राहतो आहे. त्याच्या वडिलांचा काही वर्षांअगोदर मद्यप्राशनातूनच मृत्यू झाला होता. यामुळे त्याच्या मनात बारचालक व वाईन शॉप्सविरोधात संताप होता. त्यातूनच त्याने बदला घेण्यासाठी तेथेच चोरी करण्याचे ठरविले. 

रात्रीच्या वेळी शटर तोडून गल्ल्यावर मारायचा डल्ला

त्याने शहरातील ८ दुकानांमध्ये चोरी केली. तो रात्री शटर तोडून त्याला थोडेसे वर करून कृश शरीरयष्टीचा फायदा घेत आत शिरायचा. त्यानंतर तेथील गल्ला लुटायचा. ३१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास त्याने राणी दुर्गावती चौकातील मयुरी सावजी बार ॲन्ड रेस्टॉरेन्टमध्ये अशीच चोरी केली. त्याने तेथून रोख ३६ हजार व सिगारेटची पाकिटे असा ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

मालक निलेश देवानी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसंनी राजाला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने अंबाझरी, सदर, हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारूच्या दुकानांतदेखील चोरी केल्याची माहिती दिली.

दारुचे व्यसन नाही, मात्र गांजाची नशा

आरोपीचे वडील मद्यप्राशनाने वारले होते. त्यामुळे राजा खान हा दारूचे व्यसन करत नाही. मात्र चोरलेल्या पैशांतून तो गांजाची नशा करत असल्याची बाब चौकशीतून समोर आली आहे. त्याची ही कहाणी ऐकून पोलिसांनीदेखील डोक्यावर हात मारून घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीNagpur Policeनागपूर पोलीस