शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर फुगे विकले, रात्री चाकूने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 01:04 IST

दिवसभर उन्हातानात फुगे विकणाऱ्यांचा रात्री पैशाच्या वाटणीतून वाद झाला. त्यामुळे एकाने चाकू काढून दुसºयाच्या पोटात भोसकला. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर चौकात ही घटना घडली.

ठळक मुद्देशंकरनगर चौकाजवळ घडली घटना : बजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवसभर उन्हातानात फुगे विकणाऱ्यांचा रात्री पैशाच्या वाटणीतून वाद झाला. त्यामुळे एकाने चाकू काढून दुसºयाच्या पोटात भोसकला.शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर चौकात ही घटना घडली.बिरू भगवान पुरी (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील मंडला गावचा रहिवासी आहे. तो आणि त्याच्या सोबतचे गावातील काही लोक नागपुरात कस्तुरचंद पार्कजवळ फुटपाथवर राहतात. दिवसभर वेगवेगळ्या भागात जाऊन ते फुगे विकतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ते हिंगणा परिसरात गेले होते. तिकडे फुगे विक्रीतून आलेल्या पैशातून त्यांनी अंबाझरी तलावाजवळ दारू पिली. त्यानंतर ते शंकरनगर बसथांब्याजवळ आले. तेथे फुगे विक्रीच्या पैशाची वाटणी करत असताना आरोपी खोका आणि बिरू पुरी या दोघांचा वाद झाला. तो विकोपाला गेल्यानंतर आरोपी खोकाने बिरूच्या पोटात चाकू खुपसला. यामुळे बिरू गंभीर जखमी झाला. त्यांच्या सोबत असलेल्या बच्चा बब्बू मोघिया याने कसाबसा वाद सोडवून नागरिकांना गोळा केले. नंतर बजाजनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खोकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर