समाधानाची सुपर मेट्रो
By Admin | Updated: August 10, 2015 02:31 IST2015-08-10T02:31:42+5:302015-08-10T02:31:42+5:30
उपराजधानी स्मार्ट सिटी होणार. मेट्रो रेल्वेच्या कामाची गाडीही सुपरफास्ट झाली आहे. नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी समाधान शिबिर सरकार आणि प्रशासनात महत्त्वाची भूमिका वठवित आहे.

समाधानाची सुपर मेट्रो
लोकांची कामे करा : समाधान शिबिरात मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी
नागपूर : उपराजधानी स्मार्ट सिटी होणार. मेट्रो रेल्वेच्या कामाची गाडीही सुपरफास्ट झाली आहे. नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी समाधान शिबिर सरकार आणि प्रशासनात महत्त्वाची भूमिका वठवित आहे. अशात जे अधिकारी लोकांची कामे करणार नाही त्यांना घरी पाठविले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
शहरात आयोजित पहिल्या समाधान शिबिरात प्राप्त १३३६ तक्रारी पैकी ९८१ तक्रारी निकाली निघाल्या. मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दक्षिण विधानसभा मतदार संघात दुसरे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सामान्य माणसांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी समाधान शिबिर हे हक्काचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून प्रशासनाने बजावलेल्या तत्परतेबद्दल प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारीही अभिनंदनास पात्र आहे. शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रात समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. यानंतर ४ आॅक्टोबरला पूर्व नागपूर मतदार संघात शिबिर घेण्यात येईल. पहिल्या फेरीनंतर राहिलेल्या समस्या दुसऱ्य फेरीतील शिबिरात सोडविल्या जातील.
आ. सुधाकर कोहळे यांनी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. श्याम वर्धने यांनी नासुप्रच्या विविध विकास योजनांची माहिती दिली. श्रावण हर्डीकर यांनी स्मार्ट सिटीसंदर्भात माहिती दिली.सचिन कु र्वे यांनी प्रास्ताविकातून शिबिरात आलेल्या व मार्गी लागलेल्या तक्रारींची माहिती दिली. (प्रतिनिधी)
रिंगरोडसाठी २९२ कोटी-गडकरी
शहरात अनधिकृत ले-आऊ टचा प्रश्न आहे. नासुप्रने हा प्रश्न सोडवावा. सोबतच शहरातील गरीब लोकांसाठी ५० हजार घरे उभारावी. शहरातील रिंगरोडच्या सिमेंटीकरणासाठी केंद्र सरकारकडून २९२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. १८ हजार कोटींची कामे हाती घेण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. शहराच्या विकासासोबतच युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे.
पालकमंत्री बुलेट ट्रेन
पालकमंत्री हे बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करीत आहे. मनपाच्या माध्यमातून शहरात अनेक चांगल्या योजना हाती घेण्यात आल्या आहे. २४ बाय ७ ही योजना राबविणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. समाधान शिबिराच्या माध्यमातून नियमात बसणारी कामे मार्गी लागत आहे. नासुप्र व मनपाने शहरातील अविकसित ले-आऊ टचा विकास करावा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून लोकांच्या लहानसहान समस्या मार्गी लागतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. (सविस्तर वृत्त/२ वर)
५१ जणांना प्रमणापत्राचे वाटप
समाधान शिबिरात विविध विभागाच्या ५१ प्रमाणपत्राचे लाभार्थींना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यात भूमी अभिलेख, अन्न धान्य वितरण विभाग, कामगार कल्याण मंडळ, नासुप्र, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संजय गांधी निराधार योजना, तहसीलदार नागपूर, महापालिका आदी विभागाचा समावेश आहे.
शिबिरात ८७३ तक्रारी
दक्षिण विधानसभा मतदार संघातील समाधान शिबिरात ८७३ तक्रारी आल्या होत्या. यातील ६६३ तक्रारींचा निपटारा क रण्यात आला. ३१० तक्रारिंवर कार्यवाही सुरू आहे. तसेच शिबिरातही तक्रारी स्वीकारण्यात आल्या आहेत. त्यावर समाधानाचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सचिन कु र्वे यांनी दिली.
वेबसाईटचे लोकार्पण
नासुप्रने आॅनलाईन शुल्क भरण्यासाठी व विविध योजनांची माहिती असलेली वेबसाईट तयार केली आहे. तसेच महापालिकेनेही लोकांच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्या व योजनांही माहिती व्हावी यासाठी वेबसाईट तयार केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते दोन्ही वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले.
महावितरणच्या तारा अंडरग्राऊं ड- बावनकुळे
नागपूर शहरात संजय गांधी निराधार योजनेची विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यालये सुरू करण्यात येतील. तसेच उघड्यावरील वीज तारामुळे अपघाताचा धोका असतो. ही बाब विचारात घेता महावितरणने शहरात ताराचे जाळे अंडरग्राऊं ड करण्याची योजना तयार केली आहे. त्यामुळे शहरात रस्त्याच्या कडेला विजेचे खांब राहणार नाही, भविष्यात दुर्घटना होणार नाही, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.