शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Solar Storm: सूर्यामधून निघताना दिसले अधिक शक्तिशाली ज्वाळांचे वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 09:00 IST

मानव वा पृथ्वीवर नाही; पण उपग्रहांवर परिणामांची शक्यता. सूर्याच्या हवामानाचा सातत्याने मागाेवा घेणाऱ्या ‘नासा’च्या ‘सोलर डायनॅमिक्स ऑर्बिटर’ने घेतलेला व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

- निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूर्य हा प्रचंड ऊर्जा निर्माण हाेणारा तारा आहे. गॅस व प्लाझ्मा असलेल्या ताऱ्यात हायड्राेजन व हेलियमच्या संयाेगाने प्रचंड अग्नी ज्वाळा निर्माण हाेऊन प्रकाश आणि उष्णता तयार हाेते, ही बाब सर्वश्रुत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत वेगळेच दृश्य अंतराळ संशाेधकांना दिसले आहे. सूर्याच्या गर्भात अग्नी ज्वाळांची तीव्रता वाढल्याचे व ज्वाळांचे वादळ बाहेर निघत असल्याचे संशाेधकांना आढळून आले. त्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. 

सूर्याच्या हवामानाचा सातत्याने मागाेवा घेणाऱ्या ‘नासा’च्या ‘सोलर डायनॅमिक्स ऑर्बिटर’ने घेतलेला व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. सूर्याच्या आवरणात २५ ते २८ ऑक्टाेबरदरम्यान साैर ज्वाळांचे नेत्रदीपक दृश्य कैद करण्यात आले आहे. सूर्यामधून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा (साैर फ्लेअर्स) एक्स-१ वर्गाच्या वादळाप्रमाणे हाेत्या. या दृश्याची सुरुवात साेमवारी झाली. सूर्याच्या डाव्या बाजूला सक्रिय साैर स्फाेटांची मालिका सुरू झाली. त्यानंतर लहान ज्वाळा व पाकळ्यांसारख्या विस्फाेटांची मालिका दिसून आली. त्या नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी आणि तीव्र हाेत्या. 

उत्तर-दक्षिण पाेलवर दिसेल डान्सिंग लाइट गुरुवारी सौर पदार्थाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला व ज्वलंत किरणोत्सर्गाचे वादळ बाहेर पडले. याला ‘कोरोनल मास इजेक्शन’ म्हणतात. हे चार्ज झालेले सौर कण २.५ दशलक्ष मैल प्रति तास (४ दशलक्ष किमी प्रति तास) पेक्षा जास्त वेगाने बाहेर पडले. ते कण रविवारपर्यंत पृथ्वीवर पोहोचतील, असा अंदाज हाेता. हे कण पृथ्वीच्या वातावरणाशी संवाद साधल्यानंतर नृत्य करणाऱ्या प्रकाशाप्रमाणे दृश्य दिसते ज्याला ‘ऑराेरा’ असे म्हटले जाते. हे दृश्य उत्तर व दक्षिण अक्षांशावर असलेल्या देशातील  नागरिकांना अनुभवायला मिळेल.

गुरुवारी हे स्फाेट सूर्याच्या खालच्या मध्यभागी हाेत असल्याचे दिसून आले. ते थेट पृथ्वीकडे ताेंड करून हाेत असल्याचे वर्णन नासाच्या संशाेधकांनी केले आहे. रेडिएशनच्या प्रचंड उत्सर्जनामुळे या ज्वाळा निर्माण झाल्या असून, त्यातून निर्माण हाेणारे पार्टिकल बाहेर फेकले जात हाेते. 

सूर्यावर साैर वादळे निर्माण हाेणे ही नेहमीची बाब आहे; पण हे वादळ अधिक शक्तिशाली आहे. मात्र, या ज्वाळांमधून निघणारे हानिकारक किरणाेत्सर्ग पृथ्वीच्या वातावरणातून जाऊ शकत नाही. त्यामुळे जमिनीवरील मानव किंवा सजीव सृष्टीवर त्याचे काहीही परिणाम हाेणार नाहीत. मात्र, पृथ्वीच्या चुंबकीय कक्षेबाहेर असलेल्या उपग्रह, जीपीएस किंवा संप्रेषण सिग्नलवर ते परिणाम करू शकतात.- महेंद्र वाघ, अंतराळ शिक्षक, रमण विज्ञान केंद्र