साैर ऊर्जेचे पॅनल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST2021-05-12T04:09:29+5:302021-05-12T04:09:29+5:30

रामटेक : चाेरट्याने शेतातील साैरऊर्जा संयंत्राचे १० पॅनल चाेरून नेले. त्या पॅनलची एकूण किमत एक लाख रुपये आहे. ही ...

Solar energy panel lamps | साैर ऊर्जेचे पॅनल लंपास

साैर ऊर्जेचे पॅनल लंपास

रामटेक : चाेरट्याने शेतातील साैरऊर्जा संयंत्राचे १० पॅनल चाेरून नेले. त्या पॅनलची एकूण किमत एक लाख रुपये आहे. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरधन शिवारात नुकतीच घडली.

रामदास श्रावण बावनकुळे (३८, रा. नगरधन, ता. रामटेक) यांची नगरधन शिवारात शेती असून, त्यांनी शेतात शासकीय याेजनेंतर्गत साैरऊर्जा संयंत्र लावले आहे. शेतात मध्यरात्री कुणीही नसताना चाेरट्याने त्यातील १० पॅनल चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच रामदास बावनकुळे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या पॅनलची एकूण किमत एक लाख रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार काटे करीत आहेत.

Web Title: Solar energy panel lamps