शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कंकणाकृती सूर्यग्रहण : नागपुरात  पावसाळी वातावरणामुळे खगोलप्रेमींची निराशा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:31 IST

अनेक वर्षानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याचा दुर्मिळ योग गुरुवारी आला असला तरी पावसाळी वातावरणामुळे खगोलप्रेमींच्या आणि अभ्यासकांच्या आनंदावर विरजण पडले.

ठळक मुद्देखगोलीय घटनेच्या आनंदापासून सारेच राहिले वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्षानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याचा दुर्मिळ योग गुरुवारी आला असला तरी पावसाळी वातावरणामुळे खगोलप्रेमींच्या आणि अभ्यासकांच्या आनंदावर विरजण पडले. सकाळपासून शहरात सूर्यदर्शनच न झाल्याने केवळ केंद्रावरील प्रात्यक्षिक आणि वाहिन्यांच्या बातम्यांवरच सर्वांना समाधान मानावे लागले.कंकणाकृती सूर्यग्रहणाचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांसाह विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळीच रमण विज्ञान केंद्रावर गर्दी केली होती. मात्र अवकाशातील ढगांमुळे सूर्यग्रहण पाहताच आले नाही. अनेकांनी तर पावसाळी वातावरण पाहून केंद्रावर जाणेच टाळले. रमण विज्ञान कें द्राने सिम्युलेटरच्या माध्यमातून कंकणाकृती सूर्यग्रहणाचे प्रतिरूप प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला. आपल्या परीने उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना माहिती देण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला. मात्र खरेखुरे सूर्यग्रहण पाहता न आल्याने उपस्थितांची जिज्ञासापूर्ती होऊ शकली नाही.रमण विज्ञान केंद्रावर सोलर गुगल आणि टेलिस्कोपचीही व्यवस्था होती. मात्र त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. काहींनी उत्सुकतेपोटी त्यातून सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र ढगांशिवाय काहीच दिसले नाही. सूर्यग्रहण पाहण्याचे प्रयत्न निरर्थक ठरले. विज्ञान केंद्राकडून सूर्यग्रहण पाहण्यासाठी बरेच प्रयत्न झाले, मात्र यश आले नाही. सायंकाळपर्यंत शहरात सूर्यदर्शनच झाले नाही. एक चांगली पर्वणी अवकाशात आली असली तरी वातावरणामुळे ती अनुभवता आली नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखविली.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणRaman Science Centreरमण विज्ञान केंद्र