शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ममतेची अमृतवेल : पोरक्या तान्हुल्यासाठी यशोदांचा ‘पान्हा’!, सॉफ्टवेअर इंजिनियर सुनीत झाला बाळाचा ‘मिल्क मामा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 06:44 IST

Nagpur : ही मानवतावादी कहाणी आहे नागपुरातील. ठाणे येथे नोकरीनिमित्त पतीसह स्थायिक असलेली एक महिला पहिल्या बाळतंपणासाठी नागपूरला आपल्या आईकडे आली होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली. येथील एका रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देयशोदेच्या रूपाने धावून आलेल्या मातांच्या दुधावर जगलेले ‘ते’ बाळ आता सुखरूप असून तग धरत आहे. प्रकृती सुधारल्याने बाळाला घेऊन त्याचे बाबा अलीकडेच ठाणे येथे आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत.

नागपूर : बाळाला जन्मास घालून आई देवाघरी निघून गेली. तान्हुले बाळ दुधासाठी आक्रंदत होते. काय होणार? कसे होणार? बाळाला दूध कोण देणार? एक ना अनेक प्रश्न ! पण मातृहृदय द्रवले. नागपुरातील दोन ‘यशोदा’ त्या बाळासाठी धावल्या. पोटच्या बाळाच्या हक्काचे दूध ‘त्या’ नवजातासाठी दिले. आज ते बाळही तग धरतंय आणि ममतेची अमृतवेलही माणुसकीच्या जमिनीत घट्ट मूळ धरतेय!ही मानवतावादी कहाणी आहे नागपुरातील. ठाणे येथे नोकरीनिमित्त पतीसह स्थायिक असलेली एक महिला पहिल्या बाळतंपणासाठी नागपूरला आपल्या आईकडे आली होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली. येथील एका रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सातव्या महिन्यातच प्रसृत होऊन ती मृत पावली. आई गेली. आता या असमयकालीन (प्रिमॅच्युअर) बाळाला वाचविण्याचे आव्हान होते. त्याच्या दुधाचा प्रश्न होता. डब्याचे प्रोटिनयुक्त दूध पचायला जड असल्याने देणे शक्य नव्हते. अखेर सोशल मीडिया मदतीला धावला. नागपूर मॉम्स क्लब या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर आणि ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर इंडियन या इन्स्टॉग्रामवरील ग्रुपवर नवजात बाळाला मातेच्या बाळाला दुधाची गरज असल्याची माहिती देण्यात आली. ती वाचून नागपुरातील दोन महिला आणि त्यांचे कुटुंबीय स्वयंप्रेरणेने पुढे आले. मे महिन्यापासून दीड महिना त्यांनी स्वत:च्या बाळाच्या हिश्श्यातील दूध ‘त्या’ला पुरविले.यशोदेच्या रूपाने धावून आलेल्या मातांच्या दुधावर जगलेले ‘ते’ बाळ आता सुखरूप असून तग धरत आहे. प्रकृती सुधारल्याने बाळाला घेऊन त्याचे बाबा अलीकडेच ठाणे येथे आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत.ओळखही नसताना परक्या बाळाला दूध पुरविणाऱ्या या माता आहेत ॲड. भूमिका सारडा आणि आसावरी रत्नपारखी. ॲड. सारडा या नागपुरातील हायकोर्टात प्रॅक्टीस करतात. त्यांना तीन महिन्याचे बाळ आहे. सोशल मीडियावर आवाहन वाचताच त्यांनी तयारी दर्शविली. आसावरी रत्नपारखी या पतीसह बंगलोरमध्ये एका कंपनीत नोकरी करतात. बाळंतपणासाठी आईकडे नागपूरला आल्या आहेत. त्यांना दोन महिन्याचे बाळ आहे. सोशल मीडियावरून माहिती कळताच त्यांनी तयारी दर्शविली. कुटुंबीयांनीही पुढाकार घेतला, पाठिंबा दिला.

दररोजचा ३० किमीचा प्रवासया घटनेत सुनीत नारायणे या २९ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता युवकाची धडपड कौतुकास्पद आहे. सुरुवातीला या दोन्ही मातांकडून दूध येऊन रुग्णालयातील बाळाकडे पोहचविण्याचे काम त्याचा मित्र करायचा. मात्र त्याचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सुनीतने जबाबदारी स्वीकारली. कार चालवता येत नसल्याने भर उन्हात दुचाकीवरून रोज सुमारे तीस किमी प्रवास करून त्याने दीड महिना दूध पोहचवले. उन्हामुळे दूध खराब होऊ नये, योग्य तापमान राखले जावे यासाठी आईसबॉक्सचा वापर केला. कधी दिवसातून एकदा तर कधी दोनदा चकरा मारून त्याने बाळाला दूध पुरविले.

टॅग्स :nagpurनागपूर