शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
3
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
4
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
5
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
6
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
7
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
8
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
9
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
10
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
11
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
13
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
14
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
15
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
16
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
17
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
18
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
19
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
20
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

कलह पसरविणाऱ्यांना समाजच सरळ करेल- सरसंघचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:05 AM

'आपल्या देशात विविधतेत एकता नव्हे तर एकतेची विविधता आहे.'

नागपूर : आपल्या देशातील काही तत्त्वांमुळे अस्वस्थ वाटत असल्याचे लोक म्हणतात. परंतु त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. विद्येमुळे समाजात सकारात्मक वाढते. जर विद्येचा योग्य उपयोग झाला कलह पसरविणाºया तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.

श्री नागपूर गुजराती मंडळद्वारा संचालित सायन्स कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोपीय सोहळ्याप्रसंगी ते गुरुवारी बोलत होते.ब्रिटिशांच्या काळापासून देशाने अनुभव घेतला आहे की राजकारणाच्या माध्यमातून लोकांना कायम चिथावणी दिली जाते. प्रत्यक्षात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची स्वत:ची काहीच शक्ती नसते. परंतु समाजात कर्तृत्व, सक्रियता व सकारात्मकतेच्या प्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे लोकांना देशात अंधकारमय वातावरण असल्याचे वाटते.

आपल्या देशात विविधतेत एकता नव्हे तर एकतेची विविधता आहे. सर्व वैविध्यांचा स्वीकार केला तर आपलेपणाच्या भावनेतून हा अंधकारदेखील दूर होतो, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले. आपली संस्कृती ही स्वार्थाची नसून आपुलकीची आहे. स्वार्थ आणि दरी निर्माण करणाºया तत्त्वांना जवळ करण्याऐवजी प्रेमाचा स्वीकार करायला हवा, असेदेखील ते म्हणाले. चंद्रकांत ठाकर यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन व देशभावना डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले.‘शैक्षणिक संस्थांत आपलेपणा टिकावा’कुठलीही विद्या घेत असताना त्याचा उद्देश काय याचा विचार व्हायला हवा. जगासाठी विद्याचे उद्देश सुख आहे. परंतु आत्मिक समाधान जास्त महत्त्वाचे असते. जर आपलेपणाच टिकला नाही तर ज्ञानाचा योग्य उपयोग होत नाही. मग विद्या असणारे लोक विवादांमध्ये जास्त रस घेतात. विद्येचा उपदेश वाद नव्हे तर सर्वांना आपले करणे हा असला पाहिजे. विशेष म्हणजे शैक्षणिक संस्थांत आपलेपणाचा व्यवहार झाला पाहिजे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे ‘जेएनयू’तील वादांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत