शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

फुलचंदच्या मदतीला धावून आला समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ५० टक्के जळालेली आई आणि तिला विझविण्याच्या प्रयत्नात दोन्ही हात जळालेल्या मूकबधिर वडिलांवरील उपचाराचा ...

ठळक मुद्देविविध संघटना, शेकडो लोकांनी दिला माणुसकीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ५० टक्के जळालेली आई आणि तिला विझविण्याच्या प्रयत्नात दोन्ही हात जळालेल्या मूकबधिर वडिलांवरील उपचाराचा खर्च भागविण्यासाठी दहावर्षीय फुलचंदवर कचऱ्यातील प्लास्टिक वेचण्याची वेळ आली. ‘लोकमत’ने तो चिमुकला व त्याचे कुटुंबीय सोसत असलेली वेदना पुढे आणताच अवघे समाजमन गहिवरले. असंवेदनशीलतेचा आरोप झेलणाऱ्या याच समाजातून शेकडो मदतीचे हात पुढे सरसावले आणि उदारतेचे दर्शन घडले.२४ जानेवारीच्या त्या आगीच्या घटनेमुळे उपचाराचा खर्च भागविण्यासाठी मेडिकलच्या परिसरात कचऱ्यातील प्लास्टिक वेचण्याची वेळ चौथ्या वर्गात शिकत असलेल्या फुलचंदवर आली. शासकीय रुग्णालये असताना बाहेरून औषधे आणावी लागत होती. वडिलांचा हाताला असलेली जखम यामुळे उपचाराचा खर्च भागविण्याची जबाबदारी चिमुकल्या फुलचंदवर आली. आई-वडील आणि एक वर्षाच्या भावाची सेवा करीत भल्या पहाटे उठून फुलचंद कचºयातून प्लास्टिक वेचून कसातरी उपचाराचा खर्च भागवित होता. याचे वृत्त ‘लोकमत’ने ‘आईच्या उपचारासाठी १० वर्षीय फुलचंद वेचतो कचरा’ या मथळ्याखाली ८ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. सोबतच मदतीचे आवाहनही केले. या आवाहनाला समाजमन धावून आले. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी, पत्रकार, भाजी विक्रेते, किरणा दुकानदार, अ‍ॅम्बुलन्सचालक सर्वच मदतीसाठी सरसावले. कोणी आर्थिक मदत केली, कोणी औषधे आणून दिली, कोणी जेवणाचा डबा, कोणी कपडे आणून दिले, तर काहींनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. काही जण घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत, हे मायेचे बळ देण्यासाठी मेडिकलमध्ये आले. प्रत्येकाची एकच तयारी होती ती म्हणजे त्या कुटुंबाला ‘माणुसकी’चा हात देण्याची.दत्ता मेघे यांनी उचलला शिक्षणाचा खर्चमाजी खासदार दत्ता मेघे यांनी वृत्त वाचून फुलचंदची तातडीने भेट घेतली. घडलेली घटना जाणून घेतली. फुलचंदला आर्थिक मदत करीत त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलला. याशिवाय कुठली मदत लागल्यास नि:संकोच घरी ये, असे आश्वस्त केले.दीनदयाल थाळी, समर्पण फाऊंडेशनने सोडविला जेवणाचा प्रश्नफुलचंदसमोर वडील, एक वर्षाचा लहान भाऊ यांच्या जेवणाचा प्रश्न होता. रुग्णालयाकडून आईला मिळणाऱ्या जेवणामधून कसेतरी ते पोट भरीत होते. परंतु वृत्तामुळे त्याचा जेवणाचा प्रश्नही सुटला. मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी यांनी फुलचंद आणि त्याच्या कुटुंबासाठी पं. दीनदयाल थाळी नि:शुल्क उपलब्ध केली, सोबतच उपचारासाठी मदतही केली. समर्पण फाऊंडेशननेही त्याच्या जेवणाचा भार उचलला.या संघटना, व्यक्तींनी केली भरभरून मदत‘एक पाऊल माणुसकी’ या संस्थेचे अमृता अदावडे, प्राची सहारे, साहिल सहारे, शुभम घोडे, प्रीत मेश्राम, निकेश पिने, मिनू रावत यांनी फुलचंदला मोबाईल फोन विकत घेण्यापासून त्याला मिळालेली आर्थिक मदत त्याच्या बँकेत जमा करण्यापर्यंतची मदत केली. याशिवाय, भारतीय जनता पार्टीचे दक्षिण-पश्चिमचे उपाध्यक्ष संजय जोशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहरचे अध्यक्ष बाळू घरडे, निदान वेलफेअर फाऊंडेशन, राजीवकुमार सूर्यवंशी, उत्तम सेनापती, बी.व्ही. कनेरे, किशोर भोंगाडे, सुनील सारीपुत्त, प्रकाश दर्शनिक, सुधीर अ‍ॅम्बुलन्स, अश्विन मोरे, गरज बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था, आर्थिक आझादी अभियान, श्री गुरुदेव हळद पावडर, वनमाला सोनटक्के, प्रभाकर सोनटक्के, मोनिका धाडसे आणि त्यांचा ग्रुप, किशोर भोंगाडे, दादा मामीडवार, शालिनी, वंजारी, तुषार, शुक्ला, नागपूर सिटी पोलीसचे सुरेश मिश्रा, राकेश तिवारी, किशोर ठाकरे, भागवती ठाकरे, राजेश वर्टी यांच्यासह अनेकांनी मदत केली.

 

टॅग्स :nagpurनागपूर