समाजकार्यच्या विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST2021-02-20T04:22:28+5:302021-02-20T04:22:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधनावर भर द्यावा. ...

समाजकार्यच्या विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करावे ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधनावर भर द्यावा. या विभागाच्या विविध योजनांचा फायदा समाजातील वंचित घटकांना होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी आज येथे केले.
समाजकल्याण विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे जागर समतेचा सामाजिक न्यायाचा २०२१ या मोहिमेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, नाागपूरचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, श्रीपाद कुळकर्णी, व मंगेश वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावपातळीवर सामाजिक न्यायाच्या विविध योजना, ॲट्रॉसिटी कायदा, संविधान आणि व्यसनमुक्ती आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम राबवताना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. संचालन प्रा. संध्या फटिंग यांनी केले. प्रा. विलास घोडे यांनी आभार मानले.