शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सेवेसाठी सरसावल्या सामाजिक संघटना

By admin | Updated: April 17, 2016 03:06 IST

पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणारी शोभायात्रा ज्या मार्गावरून मार्गक्रमण करते. त्या-त्या मार्गावर अनेक संस्था, संघटना सेवा देतात.

रामनवमी शोभायात्रा : रामभक्तांना पाणी, प्रसाद, ताकाचे वितरणनागपूर : पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणारी शोभायात्रा ज्या मार्गावरून मार्गक्रमण करते. त्या-त्या मार्गावर अनेक संस्था, संघटना सेवा देतात. शोभायात्रेत सहभागी रामभक्तांना पाणी, ताक, चहा आणि प्रसादही वितरित करतात. यातील सेवा देणाऱ्या काही संस्था जेव्हापासून शोभायात्रा सुरू झाली तेव्हापासून सेवा देत आहेत. शुक्रवारी निघालेल्या शोभायात्रेदरम्यान सेवेचा महासागर दिसून आला. गणेश टेकडी मंदिर संस्थाश्री गणेश टेकडी मंदिर संस्था तसेच आसपासच्या व्यापारी मंडळातर्फे लक्ष्मीनगर ते शंकरनगर मार्गावर भव्य प्रसाद वितरण व पाणी वितरण करण्यात आले. संस्थेकडून जवळपास २५० किलो बुंदी, २०० लिटर सरबत आणि १०००० पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले. या सेवा कार्यात राजू कोहळे, दिलीप शाहाकार, निशिकांत सगदेव, अरुण व्यास, राजेश साबु,सारंग पानबुडे, अलोक झंवर, आशिष निलावर, स्वानंद भोळे, दिलीप क्षीरसागर, सुरेंद्र पाटील, सुरेश खांडेकर, श्याम दडवी, संजय वाते, अविनाश देशपांडे, गणपती देव, राजू तुमडे, अतुल गुळकर, राजेश गोळे, ज्योती पानबुडे, सुप्रिया निलावार, सीमा साबु, नेत्रा देव, स्वाती वाते, शिल्पा डोंगरे, पुनम झंवर आदींचा सहभाग होता.गोकुळपेठ मित्र मंडळगोकुळपेठ मित्र मंडळाच्यावतीने कॉफी हाऊस चौक, गोकुळपेठ येथे सोनपापडीचे प्रसाद वितरण करण्यात आले. यामध्ये अनुप चव्हाण, रॉकी परिहार, गोपाळ कमलाकर, रामू चारी, नितीन गल्लेवाले, अतुल श्रीखंडे, मुस्तफा रायपूरवाले, सुरज विश्वकर्मा आदींनी सहभाग घेतला.मनोज शाहू मित्र परिवारकॉफी हाऊस चौक येथे मनोज शाहू मित्र परिवारातर्फे शोभायात्रेतील भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आले. संस्थेतर्फे २०० किलोचा मसाला भात, पायनॅपल शिरा तसेच चणा उसळ भक्तांना वितरित केले. सेवाकार्यात मनोज शाहू, श्रीकांत भोगे, सतीश चव्हाण, संतलाल गुप्ता, रमाशंकर मोरया, गुलशन वटानी, संजय कोकमवार, केशव जयस्वाल, धीरजसिंग चव्हाण, देवीदास अवचट, कमलताई खानापूरकर, नीलेश लांडे, विनोद चिकने यांचा सहभाग होता.आॅटोचालक व व्यापारी संघधरमपेठ रोडवरील आॅटोचालक संघटना व व्यापारी संघटनतर्फे शोभायात्रेत सहभागी भक्तांना बुंदी प्रसाद व सरबत वितरित करण्यात आले. संघटनेमध्ये आर.के. ट्रेडर्स, साई आॅप्टीकल्स, लाहोरी डीलक्स यांच्यासह अशोक वानखडे, गणेश वानखडे, सुधाकर पेपरवाला, रामाजी पिंगळे, विजू पाटील, सचिन करोसिया, मुन्ना रेड्डी आदींचा सहभाग होता.काकडे चौक ते हंसापुरी भारतीय मुस्लिम समाजातर्फे स्वागत द्वार, दोसर वैश्य महासभेच्यावतीने कमान, बालाजी एकता गणेश मंडळाद्वारे आकर्षक सजावट करण्यात आली होती.खरे टाऊन दुर्गा उत्सव मंडळखरे टाऊन, लक्ष्मीभुवन चौक येथील खरे टाऊन दुर्गा उत्सव मंडळातर्फे भक्तांसाठी आंब्याचे पन्हे वितरित करण्यात आले. मंडळामध्ये सुधीर खरे, विष्णू धवड, दिलीप सौदागर, हरीश ग्वालानी, बबलू पाटील, सुनील घोरमाडे, संजय भोयर, धनंजय गोवर्धन यांचा सहभाग होता.हर्षल आर्वीकर मित्र परिवारवेलणकर चौक येथील मित्र परिवारातर्फे रामभक्तांना ताक वितरित करण्यात आले. संस्थेतर्फे जवळपास ९००० पाकिट ताक वितरित करण्यात आले. सोबतच शोभायात्रेत सहभागी कार्यकर्ते आणि वाहनचालकांना आलुबोंडे आदी खाद्य पदार्थ वितरित केले गेले. विशेष म्हणजे हे सेवाकार्यचे स्टॉल मुख्यमंत्री फडणवीस यांनी १५ वर्षापूर्वी येथे सुरू केल्याचे सांगण्यात आले. संघटनेमध्ये काका देशमुख, नीलेश जोशी, अभिजित फडणवीस, महेश रामडोहकर, उमेश रामडोहकर, योगेश जोशी, विनय दाणी, अनंत पागे, संजय बंगाले, मनीष हारोडे, अ‍ॅड. प्रकाश दुर्गे आदंीचा समावेश आहे. शोभायात्रेसाठी जागोजागी स्वागतद्वारशोभायात्रेच्या स्वागतासाठी जागोजागी स्वागत द्वार उभारण्यात आले होते. यात पोद्दारेश्वर राममंदिर ते शहीद काकडे चौक जयप्रकाश गुप्तातर्फे स्वागत कमान, युवा सेनाद्वारे स्वागत द्वार, कलासागर महाविद्यालयातर्फे भगवान श्रीरामाचे आकर्षक होर्डिंग, अनिस अहमद व लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यातर्फे स्वागत फलक लावण्यात आले होते.नालसाहब चौक नवरंग फोटो स्टुडिओतर्फे देखावा आणि स्वागत द्वार, अनंत गुप्ताद्वारे सजावट या संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी आणि आकर्षक रोषणाईने सजला होता.गांजाखेत चौकअनिस अहमद यांच्यातर्फे स्वागत द्वार, माजी नगरसेवक जुल्फेकार भुट्टोद्वारे स्वागत कक्ष, गांजाखेत चौक मित्र मंडळतर्फे विद्युत रोषणाई, अमृत कलश क्रीडा मंडळातर्फे स्थानिय दृश्य, विजय पेपर मार्टतर्फे स्वागत द्वार व विद्युत सजावट करण्यात आली होती. भंडारा रोड हॉटेल श्रद्धा, तीननल चौक व्यापारी संघ, श्रीसंत उपासराव महाराज देवस्थान व भंडारा रोड व्यापारी संघतर्फे स्वागत द्वार उभारण्यात आले होते. मेटल मर्चन्टस असोसिएशनतर्फे भांड्यांचे आकर्षक स्वागत द्वार, अ.भा. स्वर्णकार समाज समितीद्वारे आकर्षक रोषणाई, स्वागत द्वार व देखावे उभारण्यात आले होते. शहीद चौक ते चितार ओळ चौक शहीद चौक मित्र मंडळाद्वारे कमान व रोषणाई, विदर्भ चंडिका दे. सेवा ट्रस्टच्या वतीने कमान, इतवारी नागपूर किराणा मर्चन्ट असोसिएशनद्वारे सजावट व कमान, सार्वजनिक काली माता उत्सव मंडळ, विनय-विवेक जैन मित्र परिवारातर्फे सजावट करण्यात आली होती.केळीबाग रोड महालक्ष्मी मंदिर ट्रस्टद्वारे महिला कक्ष, श्री कालभैरव मंदिर समितीतर्फे कमान, वाशिमकर कॅटरर्सद्वारे कमान, केळीबाग व्यापारी संघाद्वारे स्वागत द्वार. महाल चौकश्री सिद्धी विनायक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे देखावा, महाल चौक मित्र मंडळाद्वारे भव्य सजावट.नरसिंग टॉकीज चौक श्रीराम सांस्कृतिक मंडळातर्फे देखावा व सजावट, मुधोजी भोसले मित्रपरिवारातर्फे विशाल मंडप, राष्ट्रीय खादी भंडारातर्फे कमानी लावण्यात आल्या होत्या.गांधीद्वार महाल जय शिव मानस तसेच सांस्कृतिक मंडळाद्वारे देखावा, सुनील दहीकर यांच्यातर्फे स्वागत द्वार.