शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

सोशल मिडिया ते सृजनाचे रचयिता; लेखन, ऑनलाईन संमेलन, चर्चा बरेच काही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:59 IST

सोशल माध्यमे म्हणजे बाष्कळ चर्चा व डोक्याला ताप, ही बाब जवळपास सर्वांनाच माहित आहे. अफवांचा बाजार गरम करणारे हे माध्यम उत्तम हेतूनेही वापरता येते, याचीही जाणीव सर्वांनाच आहे. मात्र, सहेतुक साहित्यनिर्मितीसाठीही या माध्यमाचा उपयोग उत्तम तऱ्हेने करता येतो, याची प्रचिती रचयिता साहित्य मंचाने दिली आहे.

ठळक मुद्देदररोज सादर होतात स्वयंरचित शंभरहून अधिक कविता रचयिता साहित्य मंच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल माध्यमे म्हणजे बाष्कळ चर्चा व डोक्याला ताप, ही बाब जवळपास सर्वांनाच माहित आहे. अफवांचा बाजार गरम करणारे हे माध्यम उत्तम हेतूनेही वापरता येते, याचीही जाणीव सर्वांनाच आहे. मात्र, सहेतुक साहित्यनिर्मितीसाठीही या माध्यमाचा उपयोग उत्तम तऱ्हेने करता येतो, याची प्रचिती रचयिता साहित्य मंचाने दिली आहे.मराठी साहित्याची लेखन परंपरा सातत्याने सुरू राहावी या हेतूने रचयिता साहित्य मंचाने गेल्या दिड वषार्पासून जुन्या-नव्या सृजनकांची मोट बांधत व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे. हा ग्रुप म्हणजे महिलांना लेखणीचे माहेरघर व नवोदितांनाह हक्काचे व्यासपीठ झाला आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाचशेहून अधिक लेखक, कवि-कवयित्री जोडले गेले आहेत. या मंचाची स्थापना ९ फेब्रुवारी २०१९ रोजी गोपाल फुलउंबरकर व राहुल गावंडे यांनी केली. व्हॉट्सअपच्या माध्यमातून चारोळी, काव्य, अभंग, लेख अशा स्पर्धा सुरू झाल्या. हळूहळू समूहात साहित्यिकांची संख्या वाढत गेली आणि नवनव्या कल्पना उतरायला लागल्या. त्यात भारती भाईक, मोहिनी निनावे, अर्चना गुर्वे, कल्पना निंबोकार अंबुलकर यांनी कधी सूत्रसंचालन, कधी निवेदन तर कधी निरुपणकार म्हणून साहित्यिकांना प्रोत्साहित करण्याचे काम केले. त्याअनुषंगाने ऑनलाईन गणेशोत्सव, नवरात्रोत्सवच्या माध्यमातून सर्वांच्या सुप्त गुणांना चालना दिली जाते. त्याच अनुषंगाने पहिले राज्यस्तरीय काव्यसंमेलन नागपुरात ३ नोव्हेंबर २०१९ ला पार पडले. दोन्ही संस्थेचा वर्धापन दिवसही ऑनलाईनच पार पडला तर दोन ऑनलाईन काव्यसंमेलन घेण्याचा मानही प्राप्त झाला. तसेच काव्यस्पर्धेमध्ये २४६ कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला होता. अशा तऱ्हेने दररोज वेगवेगळ्या विषयांवर शंभरहून जास्त कविता या समूहातील सभासद लिहित असतात आणि सादर करत असतात. व्हॉट्सअपवर होणारा हा उपक्रम म्हणजे एकमेवाद्वितीय असाच आहे. यात स्मिता किडिले, माधुरी करवाडे, सुवर्णा गावंडे, साधना फुलउंबरकर यांचाही सहभाग असतो.

टॅग्स :literatureसाहित्य