बाबासाहेबांमुळेच सामाजिक व आर्थिक प्रगती

By Admin | Updated: April 25, 2016 02:50 IST2016-04-25T02:50:40+5:302016-04-25T02:50:40+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली असून, भारतीयांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे प्रतिपादन डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

Social and Economic Progress due to Babasaheb | बाबासाहेबांमुळेच सामाजिक व आर्थिक प्रगती

बाबासाहेबांमुळेच सामाजिक व आर्थिक प्रगती

स्वतंत्र मजदूर युनियनचे संमेलन : डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली असून, भारतीयांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे प्रतिपादन डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय कामगार संमेलन बैद्यनाथ चौक येथील अजंता हॉलमध्ये रविवारी पार पडले.
अध्यक्षस्थानी डॉ. सुखदेव थोरात, स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. डी.बी. वानकर, नागपूरचे महासचिव जे.एस. पाटील, विनायक निकाळे, दोन्ता प्रशांत उपस्थित होते.
थोरात म्हणाले, संविधानाच्या माध्यमातून समानता, स्वतंत्रता आणि न्यायाचा अधिकार तसेच शैक्षणिक आणि सेवांमध्ये आरक्षणाची तरतूद झाली. त्याच्या परिणामस्वरूपात भारतात ८० ते ९० लाख अनुसूचित जाती-जमातीचे कर्मचारी संघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक आणि आर्थिक उन्नती बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग आणि बलिदानामुळे प्राप्त झाली. डॉ. आंबेडकरांनी १२-१३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड (महाराष्ट्र ) येथे झालेल्या दलित रेल्वे कामगार परिषदेत ट्रेड युनियनवर भाष्य केले होते. त्यांच्या विचारामुळेच राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र मजदूर युनियनची स्थापना झाली.
यावेळी स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. डी.बी. वानकर, नागपूरचे महासचिव जे.एस. पाटील, विनायक निकाळे, दोन्ता प्रशांत यांनी मार्गदर्शन करताना अनुसूचित जाती-जनजाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक कर्मचाऱ्यांना संघटित करून आंबेडकरी कामगार आंदोलन मजबूत करण्याचे आवाहन केले.
पहिल्या सत्रात डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते युनियनच्या माईलस्टोन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक एन.बी. जारोंडे यांनी केले तर डी.एम. खैरे यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.एस. पाटील. अ‍ॅड. मनोज गोरकेला. एम. जगन्नाथन, ए.व्ही. किरण. दिलीप गामील यांनी ‘संविधानिक संरक्षण व न्यायिक भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात एस.के. सचदेव यांनी प्रास्ताविक केले. संमेलनात एआयव्हीईएफचे सरचिटणीस ए.व्ही. किरण, एमआरएमव्हीकेएसचे मुख्य संघटक एस.के. हनवते, अध्यक्ष संजय घोडके, आयएलयूचे सीडब्ल्यूसी सदस्य गणेश उके, एमआरएमव्हीकेएस, एनयूझेडचे अध्यक्ष एच.व्ही. ढोके, एसआरबीकेयूचे (रेल्वे) केंद्रीय उपाध्यक्ष सी.एस. जनबदकर, उपाध्यक्ष वा.के. कांबळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Social and Economic Progress due to Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.