.... तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू; बजरंग दलाचा व्हॅलेंटाईन दिनाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:28 IST2021-02-13T16:27:08+5:302021-02-13T16:28:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क व्हॅलेंटाईन डे किंवा वीक साजरा करण्याची पाश्चिमात्य पद्धत ही अयोग्य असून, तरुण पिढीचे नुकसान करणारी आहे, असे सांगून व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांवर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असा इशारा नागपूर जिल्हा बजरंग दलाने दिला आहे.

.... तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू; बजरंग दलाचा व्हॅलेंटाईन दिनाला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: व्हॅलेंटाईन डे किंवा वीक साजरा करण्याची पाश्चिमात्य पद्धत ही अयोग्य असून, तरुण पिढीचे नुकसान करणारी आहे, असे सांगून व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांवर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असा इशारा नागपूर जिल्हा बजरंग दलाने दिला आहे. शनिवारी दुपारी रिझर्व्ह बँक चौकात दलातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी भेटवस्तूंची होळी करण्यात आली.
व्हॅलेंटाईन डे ही आपली संस्कृती नाही. ही भोगवादी संस्कृती तरुण पिढीत फोफावत आहे. तिचा समूळ नायनाट करावाच लागेल. या दिवशी सार्वजनिक ठिकाणी जर तरुण तरुणी हा दिवस साजरा करताना आढळल्यास आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, अशा इशारा दलातर्फे देण्यात आला आहे.