...तर आत्महत्येस प्रवृत्तचा गुन्हा सिद्ध होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST2021-01-16T04:12:06+5:302021-01-16T04:12:06+5:30
नागपूर : छळ केल्याचे आरोप अपूर्ण व मोघम स्वरूपाचे असल्यास आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, असे निरीक्षण ...

...तर आत्महत्येस प्रवृत्तचा गुन्हा सिद्ध होत नाही
नागपूर : छळ केल्याचे आरोप अपूर्ण व मोघम स्वरूपाचे असल्यास आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांनी एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.
अमरावती येथील अनुराग लक्ष्मीनारायण शिवहरे (वय ४३) यांच्या अर्जावर हा निर्णय देण्यात आला. अर्चना गेडाम यांच्या तक्रारीवरून ३ जून २०१९ रोजी नांदगावपेठ पोलिसांनी शिवहरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवला होता. उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवून वादग्रस्त एफआयआर रद्द केला. अर्चना यांचे पती गजानन हे शिवहरे यांच्या हाॅटेलमध्ये वेटर होते. रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्यामुळे ते निराश होते. दरम्यान, शिवहरे यांनी त्यांचा मोबाईल जवळ ठेवून घेतला. शिवहरे त्यांचा सतत छळ करीत होते. परिणामी, त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली, असे अर्चना यांचे म्हणणे होते. परंतु, त्यांचे सर्व आरोप अपूर्ण व मोघम असल्याचे न्यायालयाने सांगितले. शिवहरेतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.