...तर कसा होणार तीर्थक्षेत्र विकास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:38+5:302021-02-05T04:42:38+5:30
रामटेक : रामटेकला विर्दभाची काशी म्हटले जाते. अनेक मंदिरांमुळे हे ठिकाण पवित्र आहे. त्यामुळे शासनाकडून करोडो रुपये गेल्या अनेक ...

...तर कसा होणार तीर्थक्षेत्र विकास?
रामटेक : रामटेकला विर्दभाची काशी म्हटले जाते. अनेक मंदिरांमुळे हे ठिकाण पवित्र आहे. त्यामुळे शासनाकडून करोडो रुपये गेल्या अनेक वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकासासाठी खर्च केला जातो. मात्र, येथे अजूनही एक चांगले स्वच्छतागृह निर्माण होऊ शकले नाही, ही शोकांतिका आहे. गडमंदिर येथून अंबाडाकडे जाणाऱ्या मार्गावर एक मुतरीघर बनविले आहे; पण त्या मुतरीघराचा दरवाजा कुणा तरी काढून नेले आहेत. गडमंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ एक मुतरीघर बनविले आहे; पण त्यात गेल्यावर अगोदर नाक बंद करावे लागते. हे स्वच्छतागृह आहे की दुर्गंधी गृह हेच कळत नाही. या परिसरात भेट देणारे पुरुष उघड्यावर विधी उरकतात; पण खरी कुचंबणा महिलांची होते.
१९९६ पासून या स्थळाचा तीर्थक्षेत्र विकास होत आहे. यापूर्वी येथे कालिदास स्मारक निर्माण केले गेले. त्यानंतर ओमची निर्मिती करण्यात आली. संगीत फवारे लावले गेले; पण येथे सुसज्ज स्वच्छतागृह मात्र उपेक्षित राहिले. भाजप सरकारने रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली. १५० कोटींचा हा आराखडा आहे. आतापर्यंत ५० कोटी मंजूर झाले. यातील २१ करोड रुपये मिळाले आहेत. पुढे नवीन निधी मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. यापूर्वी ही आराखडा मंजूर करून पूर्ण निधी प्राप्त झाला नाही, हा अनुभव आहे. त्यामुळे रामटेक तीर्थक्षेत्राचा विकास केव्हा होईल, नागरिकांना केव्हा चांगले स्वच्छतागृह मिळेल, हाही प्रश्न अनुत्तरित आहे.