शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

... तर मंगल कार्यालय संचालकांनी खर्च भागवायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 12:38 IST

Nagpur News लाॅकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असताना कर्मचाऱ्यांचे पगार, मनपाचे टॅक्स, वीज बिल आणि कर्जाचे हप्ते संचालकांना भरावेच लागत असल्याने कंबरडे माेडले आहे. अशावेळी व्यवसायावर पुन्हा बंदी आणल्यास खर्च भागवायचा कसा, हा सवाल नागपूर मंगल कार्यालय व लाॅन्स असाेसिएशनने उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देव्यवसाय करू द्या, अन्यथा वीज बिल, टॅक्स माफ करा

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या वर्षी काेराेनाचा प्रकाेप सुरू झाल्यापासून मंगल कार्यालय, लाॅन्स बंद पडले हाेते. जवळपास ११ महिने व्यवसाय ठप्प हाेता. आता कुठे व्यवसाय सुरू झाला असताना पुन्हा दुसरी लाट आल्याचे कारण देत पुन्हा मंगल कार्यालयांवर बंदी घालण्यात आली. एक तर लाॅकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असताना कर्मचाऱ्यांचे पगार, मनपाचे टॅक्स, वीज बिल आणि कर्जाचे हप्ते संचालकांना भरावेच लागत असल्याने कंबरडे माेडले आहे. अशावेळी व्यवसायावर पुन्हा बंदी आणल्यास खर्च भागवायचा कसा, हा सवाल नागपूर मंगल कार्यालय व लाॅन्स असाेसिएशनने उपस्थित केला आहे.

मंगळवारी पत्रपरिषदेत असाेसिएशनचे सहसचिव संजय काळे म्हणाले, प्रवासी वाहने, विमाने, रेस्टाॅरंट पूर्ण क्षमतेने सुरू असताना मंगल कार्यालयांवर बंदी लादण्याचे कारण काय. जागेचा अभाव राहत असताना नागरिकांना त्यांच्या घरी कमी उपस्थितीत मंगलकार्य करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण गर्दी टाळण्याची व्यवस्था असताना मंगल कार्यालयांना का नाही. बाजारात हाेणारी अनियंत्रित गर्दी मंगल कार्यालयात येणाऱ्यांपेक्षा किती तरी अधिक असते, त्यावर काय नियंत्रण ठेवता, असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारने सभागृहांच्या क्षमतेच्या ५० टक्के किंवा २०० लाेकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी दिली असून, पुण्यात या नियमानेच व्यवसाय सुरू आहे. मग नागपुरातच बंदी का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी असाेसिएशनचे सचिव विजय तलमले, आशिष देशमुख, संदीप व्हाेरा, सुधाकर बैतुले आदी उपस्थित हाेते.

असाेसिएशनच्या मागण्या

- मंगल कार्यालये नियमाचे पालन करून व्यवसाय करण्यास तयार आहेत. त्यांना क्षमतेच्या ५० टक्के किंवा २०० व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करू देण्याची परवानगी द्यावी.

- संसर्ग वाढण्यासाठी केवळ मंगल कार्यालयांना जबाबदार धरता येणार नाही.

- व्यवसाय बंद पाडणे हा पर्याय ठरू शकत नाही. अन्यथा सरकारने पगार व मेंटेनन्सचा खर्च भागविण्याची मदत करावी.

- व्यवसाय बंद करीत आहात तर वीज बिल व मनपाचे टॅक्स माफ करावे. कर्जाचे हप्ते फेडण्यात सवलत द्यावी.

- नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केल्यास आमची हरकत नाही.

टॅग्स :marriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस