शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

.. तर अकरावीच्या तब्बल ५५ हजार जागा राहणार रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:04 IST

शेवटच्या दिवशीपर्यंत ४३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी : प्रवेश फेरीदरम्यानही सुरू राहील नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीअंतर्गत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. ही संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत ५० टक्के सुद्धा नसून ५५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीपर्यंत काही ठरावीक महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत होती. यंदा संपूर्ण राज्यात ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संकेतस्थळाच्या तांत्रिक बिघाडामुळे २१ मे रोजी खोळंबलेली प्रवेश प्रक्रिया २६ मेपासून पुन्हा सुरू करण्यात आली, जी ३ जूनपर्यंत चालणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीमध्ये अडथळे येत असल्याने प्रक्रियेला पुन्हा दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यातील १९८ कनिष्ठ महाविद्यालयांच्या जवळपास ९८ हजार जागांसाठी ही प्रक्रिया घेण्यात येत आहे. गुरुवारी ५ जूनला शेवटच्या दिवशीपर्यंत केवळ ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकली. त्यातील ४१,८१५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले व ४१,१८९ विद्यार्थ्यांनी पार्ट-१ लॉक केले आहेत. ३७,७७४ विद्यार्थ्यांनी पार्ट-२ लॉक करून प्रवेश फेरीसाठी नाव निश्चित केले आहे.

दरम्यान, नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फेरीदरम्यानही नोंदणी व पार्ट-१ लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार, असे सांगण्यात येत आहे. ११ तारखेपर्यंत अंतिम यादी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अद्याप प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, शनिवारी प्राथमिक यादी लागल्यानंतर तक्रारींसाठी वेळ देत १० ते ११ तारखेपर्यंत अंतिम यादी लागण्याची व त्यानंतर प्रथम फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणAdmissionप्रवेश प्रक्रिया