पाराशर ब्राह्मण युवा मंचचे स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:51+5:302021-02-05T04:50:51+5:30
नागपूर : पाराशर ब्राह्मण युवा मंच नागपूरद्वारे समाजिक पारिवारिक स्नेहसंमेलनाचे आयोजन नंदनवन येथील सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख ...

पाराशर ब्राह्मण युवा मंचचे स्नेहसंमेलन
नागपूर : पाराशर ब्राह्मण युवा मंच नागपूरद्वारे समाजिक पारिवारिक स्नेहसंमेलनाचे आयोजन नंदनवन येथील सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सिने कलावंत देवेंद्र दोडके यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे व मोहन मते उपस्थित होते. संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रभाकर ठेंगडी व दत्तात्रय पाठक यांनी केले. संमेलनाचे संचालन व देवेंद्र दोडके यांची मुलाखत रोहिणी मोहरील यांनी घेतली. प्रास्ताविक दत्तात्रय शेगावकर, आभार प्रभाकर ठेंगडी यांनी मानले. संमेलनात श्रीकांत तिवरखेडे, प्रदीप रहिसे, गजानन माहुलकर, राहुल ठेंगडी, श्याम लांबे, अभिषेक पाठक, ओंकार पोद्दार, निखिलेश रहिसे, अजिंक्य माहुलकर, उदय गंगथडे, नेत्रा रुईकर, नितीन रुईकर, पूनम तिवरखेडे, सीमा रहिसे, किरण लांबे, तृप्ती गंगथडे, रेणुका माहुलकर, प्रतिभा माहुलकर, मंगला गंगथडे, वनिता शेगावकर, स्वाती रुईकर, सचिन रुईकर आदींचे सहकार्य लाभले. तर प्रवीण गोधे व उमेश वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.