एसएनडीएलच्या कार्यपद्धतीची चौकशी होणार

By Admin | Updated: February 23, 2015 02:29 IST2015-02-23T02:29:02+5:302015-02-23T02:29:02+5:30

एसएनडीएलच्या कार्यपध्दतीची चौकशी करण्यासाठी १५ दिवसात चौकशी समिती गठित केली जाईल. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अथवा मंत्रालयातील सचिव असतील,...

SNDL's procedure will be investigated | एसएनडीएलच्या कार्यपद्धतीची चौकशी होणार

एसएनडीएलच्या कार्यपद्धतीची चौकशी होणार

नागपूर : एसएनडीएलच्या कार्यपध्दतीची चौकशी करण्यासाठी १५ दिवसात चौकशी समिती गठित केली जाईल. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अथवा मंत्रालयातील सचिव असतील, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.
काटोल मार्गावरील विद्युत भवनात एसएनडीएलच्या कामकाजाची समीक्षा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी चर्चा केली. ते म्हणाले, एसएनडीएलने फ्रेचाईजी घेण्यासाठी केलेल्या कराराचे उल्लंघन केले काय, त्याची चौकशी ही समिती करेल. शिवाय कंपनीच्या ग्राहक सेवा आणि तक्रारींचीही चौकशी केली जाईल. दरम्यान, अहवालाच्या आधारे कारवाई करण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता पालकमंत्र्यांनी ‘सरकार त्याचा निर्णय घेईल‘ असे सांगून थेट उत्तर देण्याचे टाळले. तत्पूर्वी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी एसएनडीएलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावून ग्राहकांना चांगली सेवा मिळावी, अशी मागणी केली. महावितरणच्या काळात महापालिकांच्या उद्यानात कमी दरात वीजपुरवठा केला जात होता. एसएनडीएल मात्र व्यावसायिक दराने शुल्क वसुल करीत असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. एसएनडीएलचे स्वत:चे आयटी सेंटर नसल्याचे आणि महावितरणच्या मालमत्तेचा एसएनडीएल मालमत्ता कर देत नसल्याचा मुद्दादेखील महापौर दटके यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)

Web Title: SNDL's procedure will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.