एसएनडीएलची बँक वॉरंटी जप्त होणार

By Admin | Updated: December 13, 2015 02:52 IST2015-12-13T02:52:28+5:302015-12-13T02:52:28+5:30

शहरातील वीज वितरणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसएनडीएल कंपनीकडे ८१.३२ कोटीची थकबाकी आहे.

SNDL's bank warranty seized | एसएनडीएलची बँक वॉरंटी जप्त होणार

एसएनडीएलची बँक वॉरंटी जप्त होणार

महावितरणने बजावली नोटीस : मुदत संपल्याने कारवाईची तयारी
कमल शर्मा नागपूर
शहरातील वीज वितरणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसएनडीएल कंपनीकडे ८१.३२ कोटीची थकबाकी आहे. प्रयत्न केल्यानंतरही थकबाकीची वसुली होत नसल्याचे स्पष्ट होताच शुक्रवारी महावितरण कंपनीने २४ तासात थकबाकीचा भरणा करा अन्यथा बँक वॉरंटी जप्त करण्याचा इशारा एसएनडीएलला दिला आहे.
थकबाकी भरण्याची मुदत शनिवारी रात्री ८ वाजता संपली. त्यामुळे महावितरण सोमवारी एसएनडीएल कंपनीची ७५ कोटीची बँक वॉरंटी जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात करणार आहे. बँक वॉरंटी जप्त करण्याच्या प्रक्रियेसोबतच कंत्राट रद्द होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी एसएनडीएलला थकबाकी भरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महावितरणने एसएनडीएलला पाठविलेल्या पत्राची प्रत ‘लोकमत’कडे प्राप्त झाली आहे. पत्रानुसार ८ डिसेंबरला थकबाकी ४४.६८ कोटीवरून ८१.३२ कोटींवर गेली आहे.
११ डिसेंबरच्या बैठकीत कंपनीला आरटीजीएसच्या माध्यमातून २४ तासात थकबाकी भरण्यास सांगितले होते. या कालावधीत थकबाकीचा भरणा न केल्यास कंपनीची बँक वॉरंटी जप्त केली जाणार आहे.
एसएनडीएल नियमानुसार रकमेचा भरणा करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कालावधी संपल्यानंतरही शनिवारी रात्रीपर्यंत थकबाकी भरण्यात आलेली नव्हती. रविवारी सुटीचा दिवस असल्याने सोमवारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

Web Title: SNDL's bank warranty seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.