शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

एसएनडीएल आऊट; नागपूर शहराला महावितरण करणार वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 10:55 AM

नागपूर शहरातील वीज वितरणासाठी आता कुठलीही फ्रेन्चाईजी येणार नाही. महावितरणच आजपासून संपूर्ण शहराला वीजपुरवठ्याची जबाबदारी सांभाळेल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देशहरात यापुढे फे्रन्चाईजी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी रात्री १२ वाजता शहरातील वीज वितरणाची जबाबदारी महावितरणने आपल्या हाती घेतली. फ्रेन्चाईजी एसएनडीएलचा काळ आता संपला आहे. शहरातील वीज वितरणासाठी आता कुठलीही फ्रेन्चाईजी येणार नाही. महावितरणच आजपासून संपूर्ण शहराला वीजपुरवठ्याची जबाबदारी सांभाळेल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शहरातील महाल, गांधीबाग आणि सिव्हील लाईन्स या विभागाची २०११ पर्यंत वीज वितरण हानी ३०.०६ टक्के इतकी होती. ती कमी करण्याच्या उद्देशाने या विभागाला १ मे २०११ पासून फ्रे न्चाईजीच्या स्वाधीन करण्यात आले होते. अगोदर स्पॅन्को आणि नंतर एसएनडीएलने ही जबाबदारी पार पाडली. सध्या एसएनडीएलने त्यांची आर्थिक परिस्थितीत खराब असल्याचा हवाला देत १२ आॅगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून कामकाज सुरु ठेवण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे महावितरणने कामकाज सांभाळण्याचा निर्णय घेतला. यानंतरही एसएनडीएलच्या भरवशावर राहिलो असतो तर समस्या गंभीर झाली असती.ऊर्जामंत्र्यांनी एसएनडीएलच्या कामाचे कौतुक करीत सांगितले की, एसएनडीएलला वीज वितरणाची हानी ३०.०६ टक्केवरून १३.७ टक्केपर्यंत आणण्यात यश आले होते. वीज चोरीवरही नियंत्रण आणले.आमदारांच्या मागणीनुसार गठीत चौकशी समितीने ७०० पेक्षा अधिक तक्रारी समोर ठेवल्या होत्या. यानंतर त्यांना तीन वेळा नोटीस देण्यात आली. एसएनडीएलने यापैकी ८० टक्के निराकरणही केले. परंतु कंपनीची आर्थिक परिस्थितीतच डबघाईस आल्याने वीज वितरणावर परिणाम पडू लागला. ट्रिपींग, ट्रान्सफार्मर फेल होण्याच्या घटना वाढल्या. लो व्होलटेजची समस्याही समोर येऊ लागली. कंपनी पायाभूत विकासांवर गुंतवणूक करू शकत नव्हती. यामुळे भविष्यात वीज संकट ओढवू शकण्याची स्थिती होती. ही परिस्थिती लक्षात घेता महावितरणने वितरणाची जबाबादारी सांभाळण्याचा निर्णय घेतला. अखंडित वीज पुरवठ्यासाठी ३ कार्यकारी अभियंता, ९ अतिरिक्त कार्यकारी अभियंते, ६ उप-कार्यकारी अभियंते आणि २९ सहायक अभियंत्यांना नियुक्त करण्यात आले आहे. ३५ वितरण केंद्रांसाठी १०५ तंत्रज्ञ कर्मचारी आणि ४० इंजिनियर नियुक्त करण्यात आले आहेत. मंडळ कार्यालयात एक विशेष नियंत्रण कक्ष सुद्धा स्थापित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंते राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.थकीत वसुलीची समस्या नाहीऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महावितरणला एसएनडीएलकडून २२५ कोटी रुपये घ्यायचे आहे, आणि २२४ कोटी रुपये द्यावयाचे आहे. अशा परिस्थितीत थकीत वसुलीसंदर्भात कुठलीही समस्या नाही. दोन्ही कंपन्यांमधील हिशेबात कुठलाही मोठा फरक नही. दोन महिन्यात आॅडिट करून प्रकरणाचा निपटारा करण्यात येईल.रात्री १२ वाजता काय घडलेरात्री ठिक १२ वाजता महावितरणने एसएनडीएलच्या क्षेत्रात येणाऱ्या व जाणाऱ्या विजेची रीडिंग करून कामकाज सांभाळले. महावितरण व एसएनडीएलचे विशेष पथक गठीत करण्यात आले होते. शहरात येणाऱ्या १३२ केव्हीच्या मानकापूर, बेसा, पारडी आणि उप्पलवाडी सब स्टेशनमध्ये वीज बाहेर पडणाऱ्या मीटरची रिडींग घेण्यात आली. फ्रेन्चाईजी भागातील ४९ सबस्टेशन व स्वीचिंग सेंटरचे इनपूट रिडिंग घेण्यात आली. कार्यालयातील रजिस्टर महावितरणने आपल्या ताब्यात घेतले. याबरोबरच एसएनडीएलचे शहरातील अस्तित्व संपुष्टात आले.

टॅग्स :electricityवीज