साबरमतीच्या धर्तीवर नाग नदीचे पुनरुज्जीवन
By Admin | Updated: June 1, 2016 03:08 IST2016-06-01T03:08:57+5:302016-06-01T03:08:57+5:30
नागपूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या नाग नदीत सिवरेज व सांडपाणी सोडण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यामुळे नदी प्रदूषित झाली आहे.

साबरमतीच्या धर्तीवर नाग नदीचे पुनरुज्जीवन
प्रकल्पाचे सादरीक रण : एक हजार कोटींचा प्रकल्प
नागपूर : नागपूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या नाग नदीत सिवरेज व सांडपाणी सोडण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. या नदीला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एक हजार कोटींचा पुनरुज्जीवन प्रकल्प राबविला जाणार आहे. गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर नाग नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. मंगळवारी महाल येथील महापालिकेच्या राजे रघुजी भोसले सभागृहात आयोजित कार्यशाळेत या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
गतकाळात नाग नदीच्या पाण्याचा वापर केला जात होता. परंतु वाढत्या लोकसंख्येसाबतच नदीपात्रात सिवरेज व सांडपाणी सोडले जात असल्याने या नदीला बकाल स्वरूप आले आहे. नदीची शहरातील लांबी १७ किलोमीटर आहे. प्रवाह शुद्ध करण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर सिवरेज लाईन टाकून त्यावर ठिकठिकाणी छोटे-छोटे मलनिस्सारण प्रकल्प उभारले जाणार आहेत. दूषित पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते नदीपात्रात सोडले जाणार आहे. नदीला संरक्षक भिंत, आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ते, हिरवळ व वृक्षारोपण केले जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे अशा ठिकाणी उद्यान निर्माण केले जाणार आहे. नदीकाठावर वृक्षारोपण करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कार्यशाळेत सादर केला.
नाग नदीप्रमाणेच शहरातील पिवळी नदी व पोहरा नदीची अवस्था टप्प्याटप्प्याने या नद्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. मान्स्ूानपूर्व तयारी म्हणून शहरातील प्रमुख या नद्यातील कचरा व गाळ काढण्यासाठी महापालिका नद्या स्वच्छता अभियान हाती घेत आहे. यासोबत ठिकठिकाणी दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.
नाग नदीचा प्रवाह प्रदूषित झाल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीलगतच्या परिसरातील जलस्रोत प्रदूषित झालेले आहे.
यामुळे शहराबाहेर नदीकिनाऱ्यावरील गावातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कार्यशाळेला महापौर प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, फ्रान्सच्या शिष्टमंडळातील सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)