खवल्या मांजराची तस्करी; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST2021-06-18T04:07:59+5:302021-06-18T04:07:59+5:30
नागपूर : खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने वर्धा रोडवरून बुधवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जिवंत खवल्या मांजर ताब्यात ...

खवल्या मांजराची तस्करी; तिघांना अटक
नागपूर : खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने वर्धा रोडवरून बुधवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जिवंत खवल्या मांजर ताब्यात घेण्यात आले आहे.
१६ जूनच्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खवल्या मांजर या प्राण्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. या आधारावर नागपूर वनविभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी संयुक्तपणे सापळा रचला. एका ट्रक ट्रेलरमधून ते आणण्यात आले होते, हे विशेष !
खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतल्यावर चौकशी केली असता एका ट्रक ट्रेलरमधून ते आणल्याचे सांगितले. यावरून एमएच-४९ एटी-९५५६ क्रमांकाच्या वाहनाला आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. खवल्या मांजराला वैद्यकीय तपासणीसाठी वन्यजीव उपचार केंद्रात पाठविले. या चौकशीदरम्यान पुढे आलेल्या माहितीच्या आधारावरून बालाघाट (मध्य प्रदेश) येथून एका आरोपीला खवल्या मांजराच्या खवल्यांसह अटक करण्यात आली. यामुळे आता या प्रकरणातील आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. या सर्वांवर वन गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना पाच दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी वन विभागाने बरीच गुप्तता पाळली असून, माध्यमांनाही या माहितीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, हे विशेष !