शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून बिनबोभाट कोट्यवधींची सोने तस्करी, सुरक्षेत निष्काळजीपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 08:11 IST

कमकुवत सुरक्षेचा तस्कर उचलतात फायदा

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाहिजे तशी कडक तपासणी होत नसल्याने, रेल्वेतून नियमित कोट्यवधी रुपयांची सोने तस्करी केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. चुकून एखादवेळी सोने चोरीला गेले किंवा कुणी पळविले, तर तेवढ्या काही दिवसांसाठी रेल्वेतून सोन्याची बिनबोभाट वाहतूक केली जात असल्याचा मुद्दा अधोरेखित होतो आणि नंतर पुन्हा जैसे थे सर्व सुरू होते.

विमानतळांवर सुरक्षेच्या कडक उपाययोजना असल्यामुळे आणि सामानाची सूक्ष्म तपासणी होत असल्याने, हवाईमार्गे सोने तस्करी करण्याला बऱ्यापैकी आळा बसला आहे. लांब अंतरावर खासगी वाहनाने तस्करी करण्याचेही धोके असतात. जागोजागी पोलिसांची नाकेबंदी असते. त्यामुळे तस्करीसाठी रेल्वेगाडी सर्वात चांगली आणि सुविधाजनक वाटते. धावत्या रेल्वेत प्रवाशांची बॅग तपासली जात नाही. रेल्वेस्थानकावरही सूक्ष्म तपासणी होत नाही. त्यामुळे रेल्वेतून नियमित कोट्यवधींच्या सोन्याची बिनबोभाट तस्करी केली जाते. विशेष म्हणजे, या तस्करांवर प्रतिस्पर्धी टोळीची नजर असते. त्यामुळे टीप देऊन मध्येच सोने उडविले जाते. अशा वेळी प्रवासादरम्यान सोने चोरीला गेल्याची तक्रार दिली जाते. त्यामुळे काही दिवसांसाठी सोने तस्करीचा मुद्दा चर्चेला येतो, नंतर परत पूर्ववत होते.  

पंजाब, दिल्ली, हावडा ते साबरमती नेटवर्कnसोने तस्करीचे नेटवर्क पंजाब, दिल्ली आणि हावडा येथून चालते. अमृतसर, लुधियानामधूनही नियमित मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी केली जाते. nपंजाब, दिल्लीतून रेल्वेमार्गे भोपाळ, ईटारसी आणि इकडे नागपुरात सोने आणले जाते. या दोन्ही मार्गांवरून नंतर ते गुजरातसह विविध प्रांतात पोहोचते, अशी खास सूत्रांची माहिती आहे. जळगांवमध्ये तस्करीचे मोठे नेटवर्क आहे.

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी