शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

नागपुरात माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:47 IST

लकडगंज पोलिसांनी एका माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी करणाऱ्या टोळीस पकडले आहे. पोलिसांनी या टोळीसाठी कुरिअरचे काम करणाऱ्या दोन युवकांना अटक करीत कारसह सव्वातीन लाखाचा माल जप्त केला.

ठळक मुद्देदोन आरोपीस अटक : लकडगंज पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंज पोलिसांनी एका माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी करणाऱ्या टोळीस पकडले आहे. पोलिसांनी या टोळीसाठी कुरिअरचे काम करणाऱ्या दोन युवकांना अटक करीत कारसह सव्वातीन लाखाचा माल जप्त केला.शजेद खान ऊर्फ समीर ऊर्फ धवन ऊर्फ परवेज खान (२०) रा. ताजाबाद आणि कुणाल संजय मेश्राम (२३) रा. रमाईनगर जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा प्रमुख ताजनगर टेका येथील पिंटू खान हा फरार आहे. पोलिसांनी मेहंदीबाग पुलाजवळ होंडा सिटी कारला रोखले. कारची झडती घेतली असता त्यात ५४ हजाराची दारू सापडली. पोलिसांनी कार चालकासह त्याच्या साथीदरास अटक केली. त्यांनी पिंटू खानच्या इशाऱ्यावर ही दारू चंद्रपूरला पोहोचवीत असल्याचे सांगितले. पोलीस सक्रिय होताच पिंटू फरार झाला. त्याने कार यांच्याकडे सोपविली ही कार घेऊन चंद्रपूरला जायचे होते. तिथे पिंटू फोन करणार होता. यानंतर डिलिव्हरी घेणारा त्यांच्याकडे येणार होता. दुसऱ्यांदा ते चंद्रपूरला दारू घेऊन जाणार होते. याच्या मोबदल्यात चालकाला दीड हजार रुपये व त्याच्या साथीदरास ५०० रुपये मिळणार होते. पिंटू हा पूर्व नागपुरातील एका नगरसेवकाचा जावई आहे. काही दिवसांपासून तो बेरोजगार आहे. त्यामुळे दारू तस्करी करतो. ही कारवाई ठाणेदार संतोष खांडेकर, पीएसआय प्रफुल गाडेकर, एएसआय रवी राठोड, हवालदार प्रकाश सिडाम, दीपक कारोकार, राम यादव, सुनील ठवकर, हिरात राठोड, भूषण झाडे, फिरोज खान आणि संदीप शिरफुले यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीnagpurनागपूर