शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड, ओडिशासह साऊथमध्येही जाते तस्करीचे सोने

By नरेश डोंगरे | Updated: September 29, 2023 22:28 IST

रायपूरच्या मंडीत सोन्याची पाळंमुळं : 'कच्च्या मालात आत - बाहेरचे' अनेक खिलाडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पकडले जात असतानाही दुबईतून नागपुरात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होते. तस्करीचा हा 'कच्चा माल' एमपी, छत्तीसगड, ओडिशासह साउथमध्येही जातो. तेथून तो पक्का होऊन विविध दागिन्यांच्या रुपाने ग्राहकांच्या हातात पोहचतो. अर्थातच यातून कोट्यवधींची उलाढाल होते.

गेल्या १० दिवसांत नागपूर विमानतळावर पाच किलोवर सोन्याच्या दोन बड्या खेप पकडल्या गेल्या. १० दिवसांपूर्वी १७०० ग्राम तर आज साडेतीन किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. यापूर्वीही विमानतळावर तस्करीचे मोठ्या प्रमाणात सोने पकडले गेले. वारंवार कोट्यवधींचे सोने पकडले जात असतानाही सोन्याच्या तस्करीवर त्याचा परिणाम होत नसल्याचे दिसून येते. तस्कर वेगवेगळी शक्कल लढवून, वेगवेगळ्या पद्धतीने सोन्याची तस्करी करतात अन् अनेक जण तपास यंत्रणांना चकमा देऊन सहिसलामत बाहेरही पडतात.

सूत्रांच्या मते, अशा प्रकारे आणल्या गेलेल्या सोन्याला संबंधित वर्तुळात 'पिवळा कच्चा माल' म्हटला जातो. हा कच्चा माल नागपूर विमानतळावरून बाहेर काढणारे एक मोठे रॅकेट अनेक वर्षांपासून नागपुरात आहे. काही वर्षांपूर्वी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाच अशा प्रकारे हवाई मार्गे आणलेल्या तस्करीच्या सोन्याची खेप घेऊन जाताना पकडण्यात आले होते. त्यावेळी नागपूरचे नेटवर्क बरेच गाजले होते. या कारवाईनंतर नेटवर्क खिळखिळे झाले. नंतर मात्र अनेक कच्चे-पक्के खिलाडी या गोरखधंद्यात उतरले. त्यांची लिंक एमपी, छत्तीसगड, ओडिशा आणि साउथमध्ये आहे. नागपुरातून सर्व प्रांतात साधनांचा सुकाळ असल्याने त्या ठिकाणी येथून सहज आणि बिनदिक्कत तस्करीच्या सोन्याचे खेप तिकडे पोहचविली जातेे. सर्वाधिक सोने छत्तीसगडमध्ये पोहचत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.तीनशेवर शहरात पोहचतो रायपूरचा मालरायपूर शहरात सोन्याची मोठी मंडी आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, येथून छत्तीसगडसह अन्य प्रांतातील ३०० वर शहरात बिस्किटांसह वेगवेगळ्या दागिन्यांच्या रुपात सोन्याचा माल पोहचतो. अनेक छोटे खेळाडू पंजाब आणि दिल्लीसह रायपुरातूनच नागपूर विदर्भात सोन्याचा माल आणतात.

टॅग्स :Goldसोनं