एसएमएस वाळुज सीईटीपी कंपनीला वसुंधरा पुरस्कार
By Admin | Updated: June 11, 2016 03:13 IST2016-06-11T03:13:31+5:302016-06-11T03:13:31+5:30
राज्य शासनातर्फे कॉमन इफ्लूएन्ट ट्रीटमेंट प्लॅन्ट (सीईटीपी) गटातील पहिला वसुंधरा पुरस्कार एसएमएस वाळुज..

एसएमएस वाळुज सीईटीपी कंपनीला वसुंधरा पुरस्कार
नागपूर : राज्य शासनातर्फे कॉमन इफ्लूएन्ट ट्रीटमेंट प्लॅन्ट (सीईटीपी) गटातील पहिला वसुंधरा पुरस्कार एसएमएस वाळुज सीईटीपी कंपनीला प्रदान करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने हा पुरस्कार सुरू केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योगांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कार वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, मुख्य सचिव पी. अनुबालगन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. एसएमएस कंपनीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वाळुज औद्योगिक वसाहत (औरंगाबाद) येथे कार्यरत आहे.
रोज १० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. परम संचेती, हेमंत लोढा, आसिफ हुसैन, किशोर मालविया व गीतेश यांनी या प्रकल्पासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.(प्रतिनिधी)