शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानातून निघणारा धूर होणार प्रदूषणरहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:12 IST

मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर स्मशानातून निघणारा धूर वातावरण प्रदूषित करतो. हा धूर प्रदूषणरहित करण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नागपुरातही मोक्षधाम येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे येथील प्रकल्पाची पाहणी के ल्याची माहिती आरोग्य समितीच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आली.

ठळक मुद्देपुण्याच्या धर्तीवर राबविणार मोक्षधाममध्ये प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर स्मशानातून निघणारा धूर वातावरण प्रदूषित करतो. हा धूर प्रदूषणरहित करण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नागपुरातही मोक्षधाम येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे येथील प्रकल्पाची पाहणी के ल्याची माहिती आरोग्य समितीच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आली.चितेवरून निघणाऱ्या  धुराला एका विशिष्ट प्रकारे बाहेर काढण्यात येईल. तो एका चेंबरमध्ये जमा करण्यात येईल, जेथे पाणी सोडले जाईल. यामुळे धुरातील प्रदूषणाची मात्रा कमी होईल. त्यानंतर हा धूर एका चिमणीद्वारे १०० फूट दूर उंच आकाशात सोडला जाईल. १०० फूट उंच धूर सोडण्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरण, नगर रचना विभाग व अन्य संबंधित विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू आहे. एका चितेला अग्नी देण्याकरिता सध्या ३०० किलो लाकडे लागतात. या प्रकल्पामुळे केवळ १५० किलो लाकडे लागतील, अशी माहिती आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे यांनी दिली. यावेळी आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले, उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरवार, विशाखा बांते, गार्गी चोपरा, दिनेश यादव, वंदना चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे उपस्थित होते.देवाडिया नर्सिंग होम होणार अत्याधुनिकरुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी देवाडिया नर्सिंग होम येथे लवकरच अत्याधुनिक सामुग्री उपलब्ध केली जाणार आहे. यावर १२ कोटी ९७ लाखांचा खर्च केला जाणार आहे. देवाडियाच्याच धर्तीवर मिनीमाता रुग्णालयाचा विकास केला जाणार आहे.सोमवारपासून कुत्र्यांची नसबंदीकुत्र्यांचा प्रश्न सध्या गंभीर आहे. परंतु शासन निर्णयाप्रमाणे आता मोकाट कुत्र्यांना मारता येत नाही. त्यांची नसबंदी करण्याचे आदेश शासनाचे आहेत. त्यानुसार मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी खासगी एजन्सीला काम देण्याचे ठरले होते. मात्र,आता महापालिकेनेच नसबंदी करण्याचे ठरविले आहे. यासाठी तीन पशुचिकित्सकांची नियुक्ती के ली असून, सोमवारपासून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

 

टॅग्स :pollutionप्रदूषणnagpurनागपूर