शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 10:47 IST

तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही शासकीय पातळीवरून करण्यात आली होती.

ठळक मुद्देप्रशासन उदासीननिवड झालेल्या ग्रामपंचायतींना बक्षिसांची प्रतीक्षा

अरुण महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : शासनाने विविध कल्याणकारी योजनांसोबतच ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विविध नियमांचे पालन करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही शासकीय पातळीवरून करण्यात आली होती. मात्र, याला वर्ष पूर्ण होऊनही संबंधित ग्रामपंचायतींना बक्षिसांचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे यानिमित्ताने प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे.२राज्य शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात ‘इको व्हिलेज’ ही योजना बंद करून त्याजागी ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना सुरू केली. ही योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०१६-१७ मध्ये सुरू केली. त्यासाठी विविध नियम तयार करण्यात आले. या नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून प्रत्येकी एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. तालुकास्तरावरील ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचेही सांगण्यात आले होते. हा निधी संबंधित गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करावयाचा होता.वास्तवात, शासनाने या योजनेंतर्गत गावांची निवड केली खरी, पण संबंधित ग्रामपंचायतींना बक्षिसाची रक्कम मात्र दिली नाही.ही रक्कम बँक खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न आता संबंधित ग्रामपंचायतचे पदाधिकारी विचारत आहेत. काहींनी या दिरंगाईचे खापर प्रशासनावर फोडले असून, याला अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप केला.

निकष व स्वरूपात बदलराज्यातील सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या निकष व स्वरूपात बदल करून ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना कार्यान्वयित करण्यात आली. त्यासाठी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी एक अध्यादेश जारी करण्यात आला. शिवाय, राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना या योजनेत सहभागी होण्याची संधीही उपलब्ध करून दिली. याच नवीन निकषांच्या आधारावर ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. याला १० महिने पूर्ण झाले आहेत.

सरपंच, ग्रामसेवकांचा गौरवया योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकांचा महाराष्ट्रदिनी १ मे २०१७ रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला होता. त्यावेळी बक्षिसांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ही रक्कम अद्यापही जमा करण्यात आली नाही.

टॅग्स :Governmentसरकार